संधी व संधीचे प्रकार सोप्या पद्धतीने संपूर्ण उदाहरणासह  स्पष्टीकरण 

0
1159
sandhi v sandhiche prakar mpsc
sandhi v sandhiche prakar mpsc

संधी व संधीचे प्रकार सोप्या पद्धतीने संपूर्ण उदाहरणासह  स्पष्टीकरण 

     या  पोस्टमध्ये आपण संधी व संधीचे प्रकार सोप्या पद्धतीने संपूर्ण उदाहरणासह  स्पष्टीकरण  पाहणार आहोत ज्यामुळे  आपले संधी व संधीचे प्रकार  अधिक स्पष्ट होतील sandhi prakar in marathi  

संधी म्हणजे काय ? 

संधी | sandhi in marathi 

    जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोहोंबद्दल एकच वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय.

संधीमध्ये एकत्र येणाऱ्या पदांपैकी पहिल्या पदातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या पदातील पहिला वर्ण एकत्र येऊन दोन्हींबद्दल एकच वर्ण तयार होतो. समासात मात्र दोन शब्द फक्त शेजारी शेजारी लिहिले जातात.

संधी चे किती प्रकार आहेत ? 

संधीचे प्रकार  ३ आहेत 

१. स्वरसंधी

२. विसर्गसंधी

३. व्यंजनसंधी

१ ) स्वरसंधी = स्वर + स्वर

   एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास ‘स्वरसंधी’ असे म्हणतात.

   उदा. १) विद्या + अर्थी विद्यार्थी (आ+ अ = आ) २) देव + आलय = देवालय (अ+ आ = आ)

२) व्यंजनसंधी = व्यंजन व्यंजन / स्वर 

    जवळ येणाऱ्या वर्णांपैकी पहिले व्यंजन व दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला ‘व्यंजन संधी’ म्हणतात. 

उदा. १) सत् + आचार सदाचार (त्  + आ )    २) षट् + रिपू = षड्रिपू (ट् + र ) 

३) विसर्गसंधी = विसर्ग व्यंजन / स्वर

    एकत्र येणाऱ्या वर्णांतील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला ‘विसर्ग संधी’ म्हणतात.

१) नि: + अंतर = निरंतर        २ ) दु: + जन = दुर्जन  

स्वर संधी म्हणजे काय ? 

    दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो, याला दीर्घत्वसंधी असे म्हणतात. दीर्घसंघी

नोट :– दीर्घत्व संधी कशी ओळखावी-संधी होऊन तयार झालेल्या वर्णाला काना, दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी असते.

१. अ +अ = आ 

 • सूर्य + अस्त = सूर्यास्त
 • कट + अक्ष = कटाक्ष
 • रूप + अंतर = रूपांतर
 • स्वभाव + अनुसार = स्वभावानुसार
 • सह + अनुभूती = सहानुभूती
 • मिष्ट + अन्न = मिष्टान
 • स + अभिनय = साभिनय

२. अ +आ =आ 

 • हिम + आलय = हिमालय
 • अनाथ + आश्रम = अनाथाश्रम
 • मंद अंध = मंदांध
 • शिशिर + आगमन = शिशिरागमन
 • प्रथम +अध्याय = प्रथमाध्याय
 • सह + अध्यायी = सहाध्यायी
 • देव + आलय = देवालय
 • गोल आकार = गोलाकार
 • प्रथम + आध्याय = प्रथमाध्याय
 • पुरुष + अर्थ = पुरुषार्थ
 • फल + आहार = फलाहार
 • मंत्र + आलय मंत्रालय
 • धन + आदेश = धनादेश
 • दुःख + आर्त =  दुःखार्त
 • जन + आदेश  =जनादेश
 • कार्य + आरंभ = कार्यारंभ

३. आ + अ = आ 

 • विद्या +अर्थी = विद्यार्थी
 • विद्या + अमृत  विद्यामृत

४ .आ +आ = आ 

 • महिला +आश्रम = महिलाश्रम
 • विद्या + आलय = विद्यालय
 • कवि इच्छा = कवीच्छा
 • राजा + आश्रय = राजाश्रय
 • राजा +आज्ञा =राजाज्ञा

५ .इ + इ = ई 

 • कवि + इच्छा = कवीच्छा
 • अभि + इष्ट = अभीष्ट
 • मुनि + इच्छा = मुनीच्छा
 • दुःख आर्त = दुःखार्त

नोट :– कवि, हरि, वायु, प्रीति, गुरु हे तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त उच्चारले जातात. जसे-कवी, हरी, गुरू, वायू, प्रीती

६ .इ + ई = ई 

 • गिरि + ईश = गिरीश
 • कवि + ईश्वर = कवीश्वर
 • परी + ईक्षा =  परीक्षा 

७. ई + इ = ई 

 • रवी + इंद्र रवींद्र
 • मही + इंद्र = महींद्र
 • गोमती + इच्छा = गोमतीच्छा 

८. ई + ई = ई 

 • मही + ईश = महीश
 • पार्वती + ईश = पार्वतीश

९. उ + उ = ऊ 

 • गुरु + उपदेश = गुरूपदेश
 • भानु + उदय = भानूदय

नोट – ‘र’ चा पहिला उकार ‘रु’, दुसरा उकार ‘रू’

१०. ऊ+ उ = ऊ 

 • भू + उद्धार = भूद्धार
 • वधू + उत्कर्ष = वधूत्कर्ष
 • लघू उत्तरी = लघूत्तरी

११. ऋ + ॠ = ॠ 

 • मातृ + ऋण = मातॄण

आदेश म्हणजे काय ? 

संघी होतांना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे. याला आदेश असे म्हणतात.

२. अ / आ इ / ई = ए

अ / आउ / ऊ = ओ

अ / आॠ = अर्

गुणसंधी

गुणादेश : वरील प्रकारे दोन वर्ण एकत्र येऊन ए, ओ, अर् असे बदल झाल्याने याला गुणादेश असे म्हणतात.

१. अ+ ई = ए

ईश्वर + इच्छा = ईश्वरेच्छा

लोक + इच्छा = लोकेच्छा

मनुष्य + इतर = मनुष्येतर 

राष्ट्र + इतिहास= राष्ट्रेतिहास 

२. आ+ ई = ए

गण + ईश = गणेश

राम + ईश्वर=  रामेश्वर

गुण + ईश = गुणेश

३. आ+ इ = ए

महा + इंद्र = महेंद्र

ज्ञान + ईश्वर= ज्ञानेश्वर 

यथा + इष्ट =  यथेष्ट 

४. आ + ई = ए 

रमा + ईश = रमेश

उमा + ईश = उमेश

महा + ईश = महेश

५. अ + उ =ओ

चंद्र +उदय =  चंद्रोदय

सूर्य + उदय = सूर्योदय

पुरुष + उत्तम = पुरुषोत्तम

व्यंजन संधी

. स्पर्श व्यंजनांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता, त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते. याला ‘प्रथम व्यंजनसंघी’ असे म्हणतात.

नोट : संघी झालेल्या दोन वर्णांपैकी पहिले व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील पहिल्या स्तंभातील क, च्, ट्, तू, प् या कठोर व्यंजनांपैकी असते. तेव्हा ती ‘प्रथम व्यंजनसंधी’ असते.

विपद् + काल = विपत्काल 

 • वाग् + पति = वाक्पति
 • वाग् + ताडन  = वाक्ताडन
 • षड् + शास्त्र = षट्शास्त्र
 • क्षुध् + पिपासा = क्षुत्पिपासा
 • आपद् + काल = आपत्काल
 • शरद् + काल = शरत्काल
 • क्षुद् + पीडा = क्षुत्पीडा

२. स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. याला ‘तृतीय व्यंजन संधी’ असे म्हणतात.

नोट : संधी झालेल्या दोन वर्णापैकी पहिले व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील तिसऱ्या स्तंभातील ग, ज्, ड्, द्, व् पैकी असते तेव्हा ती ‘तृतीय व्यंजनसंधी’ असते.

 • वाक् + विहार = वाग्विहार
 • षट् + रिपू = षड्रिपू
 • सत् + आचार = सदाचार
 • उत् + गम = उद्गम
 • उत् + ध्वस्त = उद्ध्वस्त

३. स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते याला अनुनासिक संघी म्हणतात.

नोट :- अनुनासिक संधीत संधी झालेले दोन्हीही वर्ण अनुनासिके असतात.

 • षट् + मास   =  षण्मास
 • जगत् +नाथ = जगन्नाथ
 • सत् +मती =  सन्मती
 • चित्+ मय = चिन्मय
 • मत् + माता = मन्माता
 • तत् + मय = तन्मय
 • सत्+ मार्ग = सन्मार्ग

भगवत्+ नाम = भगवन्नाम

षट् +मुख = षण्मुख

वाक् + मय = वाडमय 

जगत्+ नियंता = जगन्नियंता

३. विसर्ग संधी

विसर्गाच्या मागे ‘अ’ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा ‘उ’ होतो व तो मागील ‘अ’ मध्ये मिसळून त्याचा ‘ओ’ होतो. याला विसर्ग ‘उ’ कार संधी असे म्हणतात.

नोट:- विसर्ग उकार संधी कशी ओळखावी? या संधियुक्त शब्दातील दुसऱ्या अक्षराला काना व मात्रा असतो.

 • यश:+ धन = यशोधन
 • तेजः + निधी = तेजोनिधी
 • मनः राज्य = मनोराज्य
 • मनः + बल = मनोबल
 • मनः रथ = मनोरथ
 • मनः + रंजन = मनोरंजन
 • रजः गुण = रजोगुण
 • मन: + वृत्ती = मनोवृत्ती
 • अधः + वदन = अधोवदन
 • तपः + बल = तपोबल
 • यशः + गिरी = यशोगिरी

२. विसर्गाच्या मागे ‘अ/आ’ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदूवर्ण आल्यास विसर्गाचा ‘र्’ होतो व पुढील वर्णाबरोबर संघी होते. याला विसर्ग ‘र्’ संधी म्हणतात.

 • निः + अंतर = निरंतर
 • बहिः +अंग = बहिरंग
 • निः + विकार = निर्विकार
 • नि: + इच्छा = निरिच्छा
 • दुः + देव = दुर्दैव
 • दुः +वासन = दुर्वासन

विद्यार्थी मित्रांनो निश्चितच या पोस्ट द्वारे आपणास संधी व संधीचे प्रकार त्याची उदाहरणे याद्वारे  योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच ही पोस्ट आपल्या  उपयुक्त असेल आपल्या  सहकार्यां पर्यंत ह्या पोस्टची लिंक वर शेअर करा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here