सर्वनाम व सर्वनामाचे 6 प्रकार sarvanam in marathi ।Marathi grammar

0
1038
sarvanam in marathi
sarvanam in marathi

सर्वनाम | sarvanam in marathi  सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार

सर्वनाम म्हणजे काय ?  सर्वनाम म्हणजे काय in marathi ,सर्वनाम म्हणजे काय व्याख्या ,सर्वनामाचे 10 वाक्य

‘नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम sarvanam असे म्हणतात.’ नामांची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य आहे. सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ती ज्या नामासाठी वापरली जातात, त्यांचाच अर्थ सर्वनामांना प्राप्त होतो. सर्वनामांचा वापर सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो; म्हणून त्यांना सर्वनामे म्हणतात. 

                             सर्वनामांना प्रतिनामे असेसुद्धा म्हणतात.

सर्वनामाचे प्रकार किती आहेत ? ,  सर्वनामाचे प्रकार सांगा , सर्वनामाचे मुख्य किती प्रकार आहेत ? 

उत्तर –  सर्वनामांचे खालील सहा प्रकार पडतात.

१)पुरुषवाचक

२)  दर्शक

३) संबंधी 

४) प्रश्नार्थक 

५) सामान्य / अनिश्चित 

६) आत्मवाचक

मराठीत एकूण सर्वनामे खालीलप्रमाणे ९ आहेत.

१ ) मी 

२) तू

३) तो/ती/त्या/ते

४) हा / ही / हे / ह्या

६) कोण

७) आपण

८) काय

९) स्वतः

१) पुरुषवाचक सर्वनामे :

     व्याकरणात पुरुष ही संकल्पना व्यापक आहे. मानव जातीतील नर असा त्याचा अर्थ होत नाही, तर मूर्त किंवा अमूर्त अशा कोणत्याही घटकाचा यात समावेश होतो. प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलत नाहीत. फक्त तृतीय पुरुषी सर्वनामे मात्र बदलतात.

पुरुषवाचक सर्वनामांचे खालील तीन प्रकार पडतात :

अ) प्रथम पुरुषवाचक : 

बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो, ती प्रथम पुरुषवाचक असतात.

उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः 

१) मी उद्या पुण्याला जाणार आहे. 

२) आपण सहलीला जाऊ.

३) आम्ही तुला मदत करू.

४) स्वतः खात्री करून घेतो.

ब ) द्वितीय पुरुषवाचक :

समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात, ती द्वितीय पुरुष वाचक असतात. ज्याच्याशी बोलायचे त्याचा किंवा समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करताना तिच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरली जातात, ती द्वितीय पुरुषवाचक असतात. उदा. तू, तुम्ही, आपण, स्वतः इ.

१) तू एवढा प्रसाद खाऊन टाक.

२) तुम्ही एवढे काम कराच.

३) आपण आलात, बरे वाटले. (तुम्ही)

४) आपण आत या. (तुम्ही)

५) स्वतः जाऊन आलात हे बरे झाले. (तुम्ही)

क) तृतीय पुरुषवाचक :

ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे, त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषी सर्वनामे म्हणतात.

उदा.  तो, ती, ते, त्या.

१) तो म्हणे आजारी होता.

२) ती अतिशय सुंदर होती.

३) त्या चांगले गात.

२) दर्शक सर्वनाम :

वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. जर संपूर्ण वाक्य ‘हा, ही, हे’ किंवा ‘तो, ती, ते’ बद्दल माहिती सांगत असेल तर हे शब्द वाक्याचा कर्ता असतात व ते निर्देश करतात, म्हणून त्यांना दर्शक सर्वनामे म्हणतात. 

     दर्शक सर्वनाम होण्यासाठी

वरील शब्द हे नामाऐवजी वापरावे लागतात; परंतु वरील शब्दांचा वापर नामाबरोबर त्या नामाची अधिक माहिती सांगण्यासाठी केल्यास मात्र ती दर्शक विशेषणे होतात.

उदा. कमला डॉक्टर आहे. ती डॉक्टर आहे.

वरील वाक्यात ‘कमला’ विषयी माहिती सांगितली असल्याने तो वाक्याचा कर्ता आहे व कर्ता हा नेहमीच नाम किंवा सर्वनाम असतो. त्यापुढे दिलेल्या वाक्यात ‘कमला’ ऐवजी ‘ती’ हा शब्द वापरला आहे व वाक्यसुद्धा ‘ती’ बद्दलच माहिती सांगते; म्हणून नामऐवजी आल्यामुळे ते सर्वनाम होते व ते निर्देश करते; म्हणून ‘ती’ हा शब्द वाक्यात दर्शक सर्वनाम आहे.

उदा. गोरी कमला डॉक्टर आहे. → ती कमला डॉक्टर आहे.

वरील वाक्यात मात्र ‘ती’ हा शब्द ‘गोरी’ या विशेषणाच्या ऐवजी असल्याने तो विशेषणच आहे व निर्देश करत असल्यामुळे ते दर्शक विशेषण आहे. याचा अर्थ असा होतो की, ‘तो-ती-ते-त्या, हा-ही-हे-ह्या’ चा वापर कर्त्याच्या जागी केल्यास ती दर्शक सर्वनामे होतात. कर्त्यापूर्वी केल्यास दर्शक विशेषणे होतात.

सर्वनाम कधीही नामानंतरच येते म्हणून नामानंतर वरील शब्दांचा वापर केल्यास ती दर्शक सर्वनामेच असतात. 

उदा. गंगा ही भारताची पवित्र नदी आहे.

फक्त एका नामापूर्वी वरील शब्दांचा वापर केला तर ती दर्शक विशेषणे होतात.

सर्वनाम कधीही नामानंतरच येते म्हणून नामानंतर वरील शब्दांचा वापर केल्यास ती दर्शक सर्वनामेच असतात.

उदा. गंगा ही भारताची पवित्र नदी आहे.

फक्त एका नामापूर्वी वरील शब्दांचा वापर केला तर ती दर्शक विशेषणे होतात.

उदा. तो पक्षी, ते झाड

दर्शक सर्वनाम दर्शक विशेषण 
१) ती चलाख मुलगी आहे.१) ती मुलगी चलाख आहे.
२) ही माझी पिशवी आहे.२) ही पिशवी माझी आहे
३) तो मठ्ठ मुलगा आहे.३) तो मुलगा मठ्ठ आहे.
४) गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे.४) ही गंगा हिंदूंची पवित्र नदी आहे.
५) सचिन हा चांगला खेळाडू आहे.५) हा सचिन चांगला खेळाडू आहे.
६) तो मुलगा आहे.६) तो मुलगा
७) ती डॉक्टर आहे.७) ती मुलगी डॉक्टर आहे.

३) संबंधी सर्वनामे :

गौण वाक्यातील जो-जी-जे-ज्याचा वापर पुढे येणाऱ्या मुख्य वाक्यातील तो-ती-ते-त्याशी तोच घटक आहे, असा संबंध दर्शविण्यासाठी केल्यास ती संबंधी सर्वनामे होतात.

संबंधी सर्वनामांना अनुसंबंधा सर्वनामे असेसुद्धा म्हणतात.

संबंधी सर्वनामेदर्शक सर्वनामे
१) जोतो
२) जीती
३) जेते
४) ज्यात्या

उदाहरणे – 

१) जे चकाकते, ते सोने नसते.

२) ज्याने हे भांडण उकरले, तो माघार घेईल.

३) गर्जेल, तो करील काय? (बऱ्याचदा संबंधी सर्वनाम लिहिले जात नाही) – जो गर्जेल तो करील काय?

४) प्रश्नार्थक सर्वनामे :

एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. उदा. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इ.

१) वाल्मिकीने रामायण लिहिले. कोणी रामायण लिहिले ? वाल्मिकीने काय लिहिले ?

वरील वाक्यात ‘वाल्मिकी व रामायण’ या नामाबद्दल कोण व काय हे शब्द वापरले आहेत. त्यामुळे ती सर्वनामे होतात; परंतु त्यांचा वापर नामांची पुनरावृत्ती टाळणे हा नसून प्रश्न विचारणे हा आहे; म्हणून त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात.

६. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे :

कोण / काय या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामासाठी वापरली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नसेल तर ती अनिश्चित सर्वनामे असतात. 

१) कोणी यावे टिकली मारून जावे..

२) कोणी, कोणास काय म्हणावे !

३) माझ्या मुठीत काय ते सांग पाहू!

६. आत्मवाचक सर्वनामे

आपण, स्वतः, निज या सर्वनामांचा वापर स्वतः या अर्थाने केल्यास ती आत्मवाचक सर्वनामे होतात. अशा वेळी ती कर्त्यानंतर वापरली जातात.

१) मी स्वतः त्याला पाहिले. 

२) तू स्वतः मोटार हाकशील का?

३)तो आपणहून माझ्याकडे आला.

 ४) पक्षी निज बाळांसह बागडती.

आपणास हे देखील आवडेल

शब्दांच्या जाती |उदाहरणासह स्पष्टीकरण

या पद्धतीने आपण सर्वनाम व त्याचे सहा प्रकार व त्याची माहिती उदाहरणासह पाहिली निश्चितच ही पोस्ट आपणास आवडली असेल आपल्या मित्रांपर्यंत सहकार्याने पर्यंत अवश्य ही पोस्ट ची लिंक शेअर करा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here