शब्दांच्या जाती |उदाहरणासह स्पष्टीकरण । shabdanchya jati in marathi 

0
1404
shabdaanchyaa jati mpsc
shabdaanchyaa jati mpsc

शब्दांच्या जाती | shabdanchya jati in marathi 

या ठिकाणी आपण शब्दांच्या जाती व्याख्या व उदाहरणे इत्यादी माहिती घेणार आहोत 

अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात. शब्दांना प्रत्यय जोडून वाक्यात वापरल्यास मात्र त्यांना पद असे म्हणतात. व्याकरणात शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असे म्हणतात; तर त्यास प्रत्यय जोडून बदल केल्यास विकृती म्हणतात.

शब्दांच्या जाती किती आहेत ? 

मराठीत पुढीलप्रमाणे शब्दांच्या आठ जाती आहेत.

 १. नाम 

२.सर्वनाम 

३.विशेषण 

४क्रियापद 

५.क्रियाविशेषण 

६.शब्दयोगी अव्यय 

७.उभयान्वयी 

८अव्यय केवलप्रयोगी अव्यय

नाम म्हणजे काय ? 

नाम

सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय.

 उदा. पेन, कागद, राग, सौंदर्य, स्वर्ग इ.

मराठीत नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

१. सामान्य नाम 

२.भाववाचक नाम 

३ .विशेष नाम

सामान्यनाम म्हणजे काय ? 

१. सामान्यनाम :

एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाम दिले जाते त्याला ‘सामान्यनाम‘ असे म्हणतात. 

सामान्यनाम त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते. सामान्यनामाचे अनेकवचन होते.

उदा. घर, मुलगी, ग्रह, तारा, खेळाडू, माणूस इत्यादी.

सामान्यनामाचे खालील दोन प्रकार पडतात.

अ. पदार्थवाचक नाम :

जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा कि. ग्रॅम मध्ये मोजले जातात / संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावाला

पदार्थवाचक नामे म्हणतात. उदा. तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, पाणी, सोने इ.

ब. समूहवाचक नाम:

समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात. उदा. मोळी, जुडी, ढिगारा, गंज इ.

विशेष नाम म्हणजे काय ? मराठी

२. विशेषनाम :

एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास ‘विशेषनाम‘ असे म्हणतात. ते फक्त एका घटकापुरते मर्यादित असते. विशेषनाम एकवचनी असते.

विशेषनाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते. 

उदा. गोदावरी, रमेश, औरंगाबाद, ताजमहल, सूर्य, चंद्र इ.

टीप : विशेषनाम व्यक्तिवाचक असते तर सामान्यनाम जातिवाचक असते.

उदा. निखिल (व्यक्तिवाचक), मुलगा (जातिवाचक)

भाववाचक नाम म्हणजे काय ? मराठी

३. भाववाचक नाम / धर्मवाचक नाम :

ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नामे म्हणतात.

हे घटक वस्तुस्वरूपात दाखविता येत नाहीत. उदा. सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती, गर्व इ.

टीप :- गुणधर्म व भाव दर्शवणाऱ्या शब्दांना भाववाचकनामे / धर्मवाचक नामे म्हणतात. विशेषनामे व

सामान्यनामे ही भाव किंवा धर्म धारण करतात. म्हणून त्यांना धर्मीवाचक नामे म्हणतात.

भाववाचक नामांचे तीन गट पडतात

१.  स्थिती दर्शक  उदाहरणार्थ गरिबी स्वातंत्र्य  

२. गुणदर्शक    उदा. सौंदर्य प्रामाणिकपणा 

३.कृतीदर्शक    उदा. चोरी, चळवळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here