इतिहासातील नेत्यांची महत्वाची वाक्ये – Statements from Historical Politicians
1885 ते 1920 मधील विधाने
- जॉन स्ट्रचि- भारतासंबंधी सर्वप्रथम व सर्वात आवश्यक जाणून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारत अस्तित्वात नाही आणि कधीही नव्हता.
- बदरुद्दीन तय्यबजी- राणीच्या कोट्यवधी प्रजाजनांमध्ये भारतीय सुशिक्षिता एव्हढे दुसरे कोणी राजभक्त नाही.
- आनंद मोहन बोस- सुशिक्षित वर्ग इंग्लंडचा शत्रू नाही उलट त्याच्यासमोर असलेल्या भक्त कार्यात त्याचा नैसर्गिक व आवश्यक सहकारी आहे.
- गो. कृ. गोखले – इंग्रज नोकरशाही कितीही वाईट असो, आज व्यवस्था टिकवून ठेवण्यात फक्त इंग्रजांनाच यश मिळाले आहे आणि व्यवस्थेशिवाय उन्नती शक्य नाही.
- लॉर्ड डफरीन-
- काँग्रेस केवळ संकुचित अल्पसंख्य असलेल्यांचे प्रतिनिधित्व करते.
- काँग्रेसच्या मागण्या म्हणजे अंधारतील उड्या होय.
- लॉर्ड कर्झन –
- काँग्रेस आपल्या विनाशाकडे पडझडत आहे.
- काँग्रेसच्या शांततामय मृत्यूत मदत करण्याची इच्छा.
- लाला लजपतराय- काँग्रेसच्या मवाळ धोरणाला त्यांनी संधिसाधू चळवळ असे म्हटले.
- लोकमान्य टिळक- काँग्रेसला ‘खुशामत खोरांचा मेळावा’ म्हणाले. – अधिवेशन: सुट्टीतील मनोरंजन
- लाला लजपतराय- काँग्रेसच्या अधिवेशनाचे वर्णन “सुशिक्षित भारतीयांचा वार्षिक राष्ट्रीय मेळावा.”
- लोकमान्य टिळक- वर्षातून एक वेळ आम्ही बेडकसारखे ओरडलो तर आम्हाला काहीच मिळणार नाही.
- लालमोहन घोष- लक्षावधी लोक उपाशी मरत असताना जनतेवर जबरदस्त कर लादून एका शासनाने मोठा समारंभ साजरा करणे व त्यावर भरमसाठ खर्च करणे ह्यापेक्षा दुसरी हृद्यशून्यता नाही.
- कर्झन –
- भारतीयांच्या चळवळीला हवेचे बुडबुडे म्हटले.
- पूर्वेच्या कितीतरी आधी पश्चिमेने ज्ञान मिळवले आहे, पूर्वेकडे लबाडी आणि राजकीय कपट ह्यांनाच जास्त महत्व आहे.
- लाला लजपतराय- आम्ही राजमहालाकडून गरिबांच्या झोपड्यांकडे तोंड वळविले आहे. बहिष्कार चळवळी माघे ही मानसिकता, नैतिकता व आत्मिक महत्व आहे.
- रामप्रसाद बिस्मिला- इंग्रज साम्राज्याचा नाश व्हावा ही माझी इच्चा आहे.
- महात्मा गांधी-
- आमचे मस्तक भगतसिंगांच्या देशभक्ती, साहस, जनतेविषयी प्रेम आणि बलिदानासमोर झुकून जाते.
- गांधीजींना लोक सरकारचे भरती अधिकारी म्हणत.
- इंग्रजांनो चालते व्हा, भारताला ईश्वराच्या हाती सोपवून द्या, आज भारताचे जे खोटे चित्र दिसत आहे त्याच्या जागी सर्वात चांगला भारत जन्मास येईल.
- लाला लजपतराय- काँग्रेस स्थापनेचा विचार डफरीन च्या मेंदूतून उत्पन्न झाला.
- जे. आर. सिली- भारताचा उल्लेख हा राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश असा केला आहे.
- काँग्रेस ही एक Safty Value आहे-
- लाला लजपतराय
- सी. एफ. अँड्रज
- रजनी पामदले
- गिरीजा मुखर्जी
- लोकमान्य टिळक- आपले शब्द एका वृक्षाप्रमाणे आहे, ज्यांचे मूळ म्हणजे स्वराज्य होय, तर त्यांच्या शाखा म्हणजे स्वदेशी व बहिष्कार होय.
- लाला लजपतराय-
- ह्युम स्वतंत्रता के पुजारी थे और उनका हृदय भारत की दुर्दशा पर रोता था।
- भिक्षेइतका इतर कोणत्याही गोष्टीचा तिरस्कार इंग्रज करत नाहीत, मला वाटते भीक मागणाऱ्यांचा तिरस्कारच करायला हवा. आम्ही भिक्षेकरी नाही हे इंग्रजांना दाखवून दिले पाहिजे.
- लोकमान्य टिळक- तुम्ही स्वदेशीचा स्वीकार केला तर परदेशी मालाचा बहिष्कार केलाच पाहिजे.
- लॉर्ड मॅकडोनाल्ड – प्लासीच्या लढाईनंतर केलेली सर्वात मोठी चूक (बंगालची फाळणी)
- लोकमान्य टिळक- चळवळीचे चटके बसल्याशिवाय ब्रिटिश सत्ता वितळणार नाही.
- अरविंद घोष- राजकीय स्वातंत्र्य हा राष्ट्राचा जीवनश्वास आहे.
- सर सय्यद अहमद खान- हिंदू मुसलमान म्हणजे सुंदर अशा भारत वधूचे दोन डोळे आहेत.
- सुरेंद्रनाथ बॅनर्जी- 1909 चा कायदा हा लोकशाही तत्वाला फासलेला हरताळ आहे.
- मोंटेग्यू- बेझंट व टिळक या दोघांनी काँग्रेस पूर्णपणे जिंकली, होमरूल चळवळ ती आता काँग्रेसची होऊन बसली.
- लोकमान्य टिळक-
- जर भगवान अस्पृश्यता, जातीभेद मानत असेल तर मी भगवानाला मानणार नाही.
- भारत त्या मुलासारखा आहे जो आता जवान झाला आहे, समयसूचकता हीच आहे की आता बापाने त्याला त्याचे जन्मसिद्ध हक्क देऊन टाकावे.
- ह्युम- असंघटित लोक कितीही बुद्धिमान आणि उच्च आदर्श बाळगणारे असोत, एकाकी अवस्थेत दुर्बल असताना त्यासाठी गरज आहे संघटन असण्याची.
- व्योमेशचंद्र बॅनर्जी- काँग्रेसचा विचार डफरीन च्या मेंदूतून उत्पन्न झाला.
- बी पाल(1887)- मी इंग्रजांना एकनिष्ठ आहे कारण माझ्या दृष्टीने ब्रिटिश साम्राज्याप्रति एकनिष्ठ असणे आणि आलेल्या देश व देशवासीयांशी एकनिष्ठ असणे वेगळे नाही.
- बंकिमचंद्र चॅटर्जी- काँग्रेसचे लोक पदांसाठी भुकेले असलेले राजकारणी आहेत.
- अरविंद घोष
- काँग्रेसच्या धोरणाला भेकड असे नाव
- काँग्रेस मृत्यूपंथाला लागली असे स्पष्ट
महत्वाची पुस्तके-
म गोविंद रानडे : Essays in Indian Economy (1898)
दादाभाई नौरोजी: Indian Poverty and un British Rule in India (1901)
रमेशचंद्र दल: Economic History of India (1901)
अरविंद घोष: लेख New Lamp for Old I
- बंकिमचंद्र चॅटर्जी – मातृभिमीची सेवा, मुख्य संदेश
- स्वामी विवेकानंद- भारतीय अध्यात्माने पश्चिम जिंकण्याचे धोरण
- स्वामी दयानंद सरस्वती- भारत भारतीयांचा हा नवा संदेश
- लोकमान्य टिळक- प्लेग पेक्षा सरकारी प्रयत्न जास्त क्रूर आहेत. – स्वधर्मासाठी स्वराज्य खूप आवश्यक आहे.
- बी. पाल- नव्या सुधारणा नव्हे तर पुनर्रचना देशाची मागणी आहे.
- लाला लजपतराय- ज्या प्रमाणे गुलामांना आत्मा नसतो त्याप्रमाणे गुलाम असलेल्या जनतेलाही आत्मा नसतो.
- लोकमान्य टिळक- आजकाल शहरात पसरलेला प्लेग हा त्याच्या मानवी रुपापेक्षा अधिक दयाळू आहे.
- चर्चिल (1942)- ब्रिटिश साम्राज्याच्या विनाशासाठी मी पंतप्रधान झालो नाही.
- गांधी-
- क्रिप्स मिशन बाबत- बुडणाऱ्या बँकेचा पुढील तारखेचा चेक
- इंग्रजांनो चालते व्हा.
- गोखले-
- मानवता देवात असेल तर दादाभाई नौरोजीच असतील.
- दादाभाई नौरोजी यांना भारताचे ग्लॅड्स्टन असे काहीजण म्हणतात.
- सरकार गोखलेंना- जहालवादाचे प्रतिनिधित्व करणारे छुपे राजद्रोही म्हणत
- मोर्ले गोखलेंना- वाजणारा चिमटा म्हणत.
- सरोजिनी नायडू गोखलें बाबत- व्यवहारवादी, परिश्रमी कार्यकर्ता, कल्पनेत रमणारा, दुर्मिळ मिश्रण असणारा असे म्हटले.
- व्हेलिंटन चिरोल-
- टिळकांना: भारतीय असंतोषाचे जनक
- टिळकांचे ग्रंथ- द आर्टिक होम ऑफ द वेदाज
- गीता रहस्य
- लाला लजपतराय यांना पंजाब केसरी म्हणतात.
- गांधीजींचे लजपतराय यांच्या विषयी वाक्य- भारतीय सुर्यमंडळातून एक तारा अस्तंगत झाला.
- गांधीजींनी आदर्श राज्याला रामराज्य म्हटले होते.
- अर्नाल्ड टॉयनबी – मानवी इतिहासावर गांधीजींचा प्रभाव हा हिटलर आणि स्टॅलिन पेक्षा चिरस्थायी असेल.
- सुभाषचंद्र बोस-
- असहकार चळवळ मागे घेणे म्हणजे देशाचे दुर्भाग्य (नॅशनल क्ल्ँमिटी होय.(1922)
- कायदेभंगाची (1930) चळवळ मागे घेणे म्हणजे अपयशाची कबुली होय.
- Forward Block- 1947 चे हस्तांतरण हे खोटे हस्तांतरण होते.
- सय्यद अहमदखान- हिंदू व मुसलमान हे सुंदर वधूचे दोन डोळे!
- सर सय्यद खान-
- भारताचे प्रत्येक नागरिक हिंदू आहे मला खेद आहे की, तुम्ही मला हिंदू मानत नाहीत.
- आम्ही मनाने, हृदयाने एक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आम्ही जर एक झालो तर परस्परांचा आधार बनू. आणि जर एकमेकांचा विरोध करत राहिलो तर आम्हा दोघांचाही नाश होईल.
- 1888 नंतर सर सय्यद खान यांच्या विचारांत बदल : हिंदू आणि मुसलमान दोन शब्द आहेत एव्हढेच नाही तर ते विरोधी शब्द आहेत.
- वि. दा. सावरकर – हा हिंदूंचा देश आहे, इथे मुसलमानांनी अल्पसंख्याक प्रमाणेच राहिले पाहिजे कारण लोकशाहीत बहुमताची सत्ता असते.
- दादाभाई नौरोजी- भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुभती गाय होती.
- मॉटेग्यू – जालियनवाला बाग हत्याकांडाचा उल्लेख प्रतिबंधात्मक हल्ला असा केला.
- मोर्ले – वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी (आकाशातील चंद्र मागण्यासारखे) होय.
- बिपीनचंद्र- काँग्रेसची स्थापनेला सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा असे संबोधले.
- गोखले- बहिष्कार हे अस्त्र पराकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे.
- जवाहरलाल नेहरू- ही एक खेदाची गोष्ट आहे की क्रिस्प सारखी व्यक्तीही स्वतःला सैतानाचा वकील बनू देते.
- गांधीजींनी – दिनशॉ वाच्छा यांना पत्राद्वारे- उगवती पिढी केवळ निवेदने इत्यादींनी समाधानी होणार नाही.दहशतवाद संपविण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे व तो म्हणजे सत्याग्रह!
- सुभाषचंद्र बोस- तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल.
- कर्तारसिंग- जन्मठेपेपेक्षा फासावर जाणे मला अधिक आवडेल, माझ्या मायभूमीस स्वातंत्र्य करण्यासाठी मला पुनर्जन्म मिळावा अशी माझी इच्छा आहे: – फाशी जाण्यासारखा दुसरा आनंद नाही.