प्राचीन भारत नोट्स 1 – Ancient India Notes 1 For MPSC

0
960

प्राचीन भारत नोट्स 1 – Ancient India Notes 1 For MPSC

Stone Age and Indus Valley Civilization

इतिहासाची आवश्यकता व इतिहासाची साधने

इतिहास म्हणजे काय?

  • भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय.
  • भूतकाळात जे काही घडले आहे ते समजून घेणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे होय.

इतिहासाची आवश्यकता

इतिहासाच्या अभ्यासातून आपल्या पूर्वजांनी केलेली प्रगती समजते. त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या विषयी आपल्या मनात अभिमानाची भावना तयार होते. पूर्वजांनी केलेल्या चुका आपल्याला टाळता येतात आणि भविष्यात प्रगती करणे शक्य होते. 

कालगणना

  • घटनांचा कालक्रम ठरवण्यासाठी काळ मोजण्याची जी पद्धत वापरतात तिला ‘काल-गणना’ म्हणतात.
  • स्थूलमानाने येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सनाची कालगणना करतात. अरबी भाषेत येशू ख्रिस्ताना ईसा म्हणत आणि ईसा वरून इसवी हा शब्द तयार झाला.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांना सोयीचे व्हावे म्हणून इसवी सन ही कालगणना आज जगभर वापरली जाते.
  • इसवी सनापासून एखादी घटना 157 वर्षांनी घडल्यास इसवी सन 157 असे लिहितात.

इतिहासाची साधने

भौतिक साधने- पुरातन काळातील वस्तू, घरे, इमारती, लेणी, मंदिरे इत्यादी भौतिक साधने आहेत.

लिखित साधने- मंदिराच्या भिंती, लेखांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, इत्यादींवर कोरलेले लेख.

सुरुवातीच्या काळात माणूस कच्च्या विटा, पपायरस झाडाच्या साली, ताडपत्रे, भुजपत्रे यांवर बोरूने लिहीत असे.

मौखिक साधने- ओव्या, लोकगीते, लोककथा

भारताच्या प्राचीन इतिहासाची साधने- वैदिक वाङमय, रामायण, महाभारत, जैन ग्रंथ, बौद्ध ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख, उत्खननात सापडलेल्या वस्तू.

प्राचीन भारत

अ) प्रागैतिहासिक कालखंड (अष्मयुग)

अश्मयुगात माणसाने दगड, लाकूड, हाडे यांचा वापर करून हत्यारे व अवजारे बनवली होती.

अश्मयुगाचे प्रकार-

१) पुराणाश्मयुग 

२) नवाश्मयुग

पुराणाश्मयुगाचा कालखंड – इसवी सन पूर्व 20 लाख वर्षे ते इसवी सन पूर्व 30,000 वर्षे

आंतराश्मयुगाचा कालखंड – इसवी सन पूर्ण 30000 वर्षे ते इ स पूर्व 10000 वर्षे

नवाश्मयुगाचा कालखंड – इ स पूर्व 10000 वर्षे ते इ स पूर्व 500 वर्षे

अश्मयुगातील हत्यारे सापडलेली ठिकाणे

  • कांग्रा व बेलन बोरे (उत्तर प्रदेश)
  • गुलेर (पंजाब)
  • लंघजन (गुजरात)
  • महेश्वर, राज पिपला (मध्ये प्रदेश)
  • नेवासे, इनामगाव (महाराष्ट्र)
  • ब्रम्हगिरी (कर्नाटक)

नवाश्मयुगाची वैशिष्ट्य

शिकार करणे, शेतीचा प्रारंभ, भटक्या जीवनाचा अखेर, स्थिर जीवनाची सुरुवात, कातडे सोलने, मांसाचे तुकडे करणे, झाडांची साल काढणे, पशुपालनास सुरुवात, मातीची भांडी बनवणे, धातूचा वापर, धर्म कल्पनांना उदय.

अश्मयुगातील मानवाचे सांस्कृतिक जीवन

  • निवासस्थाने- सुरुवातीला मानवाने गुहा व खडकातील कपारींचा उपयोग केला. या गुहांची व कपारींची तोंडे वाऱ्याच्या दिशेला असणार नाहीत याची दक्षता घेतली जात होती. त्यानंतरच्या काळात वासुदेवाच्या टोपीच्या आकाराच्या झोपड्या बांधण्याचे तंत्र विकसित झाले. झोपड्यांसाठी झाडांचा पाला, बांबू, लाकडे, गवत, माती, लाकूड, बांबू यांचा वापर होऊ लागला. नवाश्मयुगाच्या शेवटी दगड, माती, लाकूड व बांबू यांचा वापर होऊ लागला.
  • हत्यारे व अवजारे- मानवाचे भटके जीवन नष्ट झाल्यावर, गारगोटी पासून धारदार पाती, छोट्या छन्या, टोकदार बाण इत्यादी हत्यारांची निर्मिती होऊ लागली. सांबरांची शिंगे व हाडे यांचाही हत्यारासाठी उपयोग होऊ लागला. कठीण कुऱ्हाडीचा वापर होऊ लागला. भांडी बनवण्यासाठी कुंभाराच्या चाकाचा वापर होऊ लागला. शेतीचा शोध लागला.
  • शेती व पशुपालन – अश्मयुगातील मानवाच्या प्रगतीचा हा महत्वाचा टप्पा मानला जातो. दीर्घकालीन निरीक्षण व अनुकरणातून शेतीचा व पशुपालनाचा जन्म झाला.
  • वेशभूषा – सुरुवातीच्या काळात मानव नग्न अवस्थेत फिरत होता. ताग, जवस, वाख इत्यादींच्या धाग्यांना पिळ देऊन माणूस जाडीभरडी वस्त्रे बनवू लागला.
  • कला – स्थैर्यामुळे मानवाच्या सांस्कृतिक विकासाला सुरुवात झाली. हाडे, दात, फळांच्या बिया यांच्या माळा बनवण्याचे तंत्र मानवाने विकसित केले. याच काळात मानवाने गुहा चित्रे (यात रानरेडे, हत्ती व घोडे) काढण्यास सुरुवात केली.
  • धार्मिक कल्पना – अश्मयुगातील मानवाच्या धार्मिक कल्पना समजण्यासाठी गुहाचित्रे व मूर्ती यांचा वापर होतो. निसर्गाच्या रौद्र रुपापासून रक्षण करण्यासाठी निसर्गशक्ती देवता मानण्यास मानवाने सुरुवात केली. प्राणीदेवतेची पूजा होऊ लागली. मृत्यूचे गूढ वाढत गेल्याने मृत व्यक्तीबरोबर अलंकार, शंख शिंपले, हत्यारे यांचे दफन करण्यात येऊ लागले. सूर्य आणि पाऊस यांची उपासना होऊ लागली.

ब) इतिहासपूर्व काळ (सिंधू संस्कृती)

सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडलेली ठिकाणे

  • हडप्पा : पश्चिम पंजाब -पाकिस्तान
  • मोहेंजोदडो : सिंध प्रांत, पाकिस्तान
  • रोपार : पंजाब
  • कालिबंगण : राजस्थान

सिंधू संस्कृतीचा शोध लावणारे आद्य संशोधक

  1. दयाराम सहानी, हडप्पा (1921)
  2. राखालदास बॅनर्जी, मोहेंजोदडो (1922)

सिंधु संस्कृतीचा कालखंड

सिंधु संस्कृतीचा कालखंड इ.स. पूर्व 2700 ते इ.स. 1500 पर्यंत मानला जातो. 

सिंधू संस्कृतीचा विस्तार

पाकिस्तानातील पंजाब, सिंध प्रांतापासून ते दक्षिणेस महाराष्ट्रापर्यंत व उत्तरेस उत्तर प्रदेश पर्यंत.

सिंधू संस्कृतीची नगररचना

उत्खननात सिंधू संस्कृतीची नगररचना ही प्रगत व नियोजनबद्ध आढळली आहे. शहराच्या संरक्षणासाठी सभोवताली तटबंदी होती.

सिंधू संस्कृतीतील रस्ते

सिंधू संस्कृतीच्या अवशेषांवरून सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती होती याची साक्ष पटते. सार्वजनिक वाहतूक व दळणवळण यास अडथळे येणार नाहीत असे रस्ते होते. रस्ते रुंद व सरळ होते. रस्त्याची रुंदी ही 14 फुटांपासून 33 फुटांपर्यंत होती. प्रत्येक गल्लीत एक सार्वजनिक विहीर होती.

सांडपाण्याची व्यवस्था

सिंधू संस्कृतीतील नगरांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भुयारी गटारांची व्यवस्था होय . प्रत्येक रस्त्याच्या बाजूस विटांनी बांधलेली गटारे आढळतात . लहान गटारांचे सांडपाणी मोठ्या गटात सोडण्याची व्यवस्था असे . गाळ साचू नये म्हणून मध्ये – मध्ये खड्डे असत . गटारे साफ करण्याची व्यवस्था असे .

सिंधू संस्कृतीतील इमारती

सिंधू संस्कृतीतील इमारतींचे मुख्य तीन प्रकार पडतात . ( १ ) राहण्याची घरे , ( २ ) मोठ्या इमारती ( ३ ) सार्वजनिक स्नानगृहे .

राहण्याची घरे बांधताना सोयी व स्वच्छता याची पूर्ण काळजी घेतली जाई. मध्यभागी चौक सभोवती खोल्या अशी व्यवस्था असे. स्नानगृह, स्वयंपाकघर, कोठीची खोली, विहीर, नोकरांची खोली इत्यादी सुविधा असे. मोठ्या इमारती ८० फूट लांब व ८० फूट रुंदीच्या सभागृहासारख्या आहेत. याशिवाय १८० फूट लांब व १०८ फूट रुंद असे महास्नानगृह आढळते. मध्यभागी तलाव आणि कपडे बदलण्यासाठी सभोवती खोल्या असत.

आहार : बार्ली , गहू , तांदूळ इत्यादी धान्याबरोबरच बैल , बकरे , डुक्कर , कोंबड्या , कासव , घार आणि बदके या प्राण्यांच्या मांसाचा उपयोग अन्न म्हणून होत असे.

प्राणी : गाय , बैल , म्हैस , रेडा , मेंढी , हत्ती , डुक्कर , उंट , सिंह , घोडा , वाघ , माकड , गाढव , कुत्रा इत्यादी प्राणी त्या वेळी होते .

अलंकार : सोने , रुपे , तांबे , ब्राँझ इत्यादी धातूंचे दागिने ते वापरत .

परदेशी व्यापार : इराण , इराक , इजिप्त , ओमान इत्यादी प्रदेशांशी व्यापार होत असे . 

कला : रंगवलेली मातीची भांडी , प्राण्यांची चित्रे , गवा , रेडा , बैल या प्राण्यांचे शिक्क्यावर अस्तित्व , ब्राँझमधील नर्तकीची प्रतिमा , पुतळे , सोन्याचे दागिने.

सिंधू संस्कृतीकालीन लोकांची वांशिक जडण – घडण : ऑस्ट्रेलॉइड , मंगोलॉइड , अल्पाइन , मेडिटरेनियम वंश.

सिंधू संस्कृतीचा वारसा : निसर्गपूजा , वृक्ष पूजा , शिवपूजा , स्वस्तिक हे सूर्याचे प्रतीक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here