तलाठी भरती- नवीन पदे भरण्याबद्दल नवीन परिपत्रक काल जाहीर! – Talathi Bharti 2023

0
288
Talathi Bharti New Update
Talathi Bharti New Updat

तलाठी भरती- नवीन पदे भरण्याबद्दल नवीन परिपत्रक काल जाहीर! – Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023

Talathi Bharti New Update

महसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचे माहित होत आहे. या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. ता PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा. या नवीन माहिती पत्रकानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 117 पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे.

महसूल विभाग अंतर्गत “तलाठी” पदाच्या 117 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

 

या प्रसिध्दीपत्रकाव्दारे सूचित करण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदभरतीचे अनुषंगाने महसूल व वन विभाग यांचेकडील पत्र क्र. तलाठी-2022/प्र.क्र. 190/ई-10 दिनांक 15/12/2022 अन्वये तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रीया पार पाडण्यासाठी शासन स्तरावरुन जाहिरात प्रसिध्दी देण्यात येणार असून, तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करणेकरिता विभागस्तरावर व जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्याबाबत मा. अपर जमाबंदी आयुक्त, आणि अतिरिक्त संचालक, भूमि अभिलेख पुणे यांचेकडील पत्र क्र.तलाठी भरती/प्र.क्र.31/2023 दिनांक 25/05/2023 अन्वये सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने या प्रसिध्दीपत्रकाव्दारे “जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग करीता तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करणेकरिता खालीलप्रमाणे मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात येत आहे.

राज्यभरात रिक्त असलेल्या तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी मे महिन्याच्या सुरुवातीला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तलाठी भरतीसाठी TCS कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे मात्र, या बैठकीनंतर भरती केव्हा होणार याविषयी सरकारकडून केवळ घोषणाच होत आहेत प्रत्यक्षात तलाठी पदासाठी जाहिरात अद्यापही प्रसिद्ध झालेली नाही.  राज्य शासनाच्या विविध विभागांत हजारो पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे लाखो बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात असल्याचे परस्परविरोधी चित्र आहे त्यातच गत काही महिन्यांपासून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तलाठ्यांची ४ हजारांच्यावर पदे भरण्याची घोषणा करीत आहेत या भरतीसाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या आहेत मात्र, मे महिना संपला तरी तलाठी पदाच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही त्यामुळे, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने ७५ हजार जागांवर मेगाभरती करण्याचा संकल्प केला आहे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिसेंबर २०२२ मधील विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरामध्ये तलाठी पदभरती करण्याचे सूतोवाच केले होते राज्यात तलाठी भरती २०१६ मध्ये जिल्हा निवड समितीच्या वतीने घेण्यात आली होती. त्यानंतर २०१९ पासून अद्यापही भरती झालेली नाही त्यामुळे, तलाठ्यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. तरीही प्राप्त माहिती  नुसार तलाठी भरतीची जाहिरात लवकरच येणे अपेक्षित असल्याचे समजते. 

महसूल व वन विभागाचा डिसेंबर २०२२च्या शासन निर्णयानुसार नव्याने ३११० तलाठी पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली होती. पूर्वीच्या १०१२ रिक्त पदांसह ४११२ पदांची भरती करण्याचे शासनाद्वारे वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, भरती प्रक्रिया अद्यापही रेंगाळलेली आहे. शिंदे- फडणवीस सरकारने पारदर्शक पदभरतीसाठी टीसीएस आणि आयबीपीएससारख्या विश्वासू संस्थांची निवड २०२२ च्या शासन निर्णयाद्वारे केली. त्यानंतर तलाठी भरतीला गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अद्याप काहीच झालेले नाही.

अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ