Tanu Jain IAS Success Story :तनु जैन यांचा BDS ते UPSC प्रवास जाणून घ्या .. कशी झाली IAS?

0
107
Tanu Jain IAS Success Story
Tanu Jain IAS Success Story

Tanu Jain IAS Success Story :तनु जैन यांचा BDS ते UPSC प्रवास जाणून घ्या .. कशी झाली IAS?

Tanu Jain IAS Success Story

Tanu Jain IAS Success Story

Tanu Jain IAS Success Story:नमस्कार मित्रांनो, यूपीएससी(UPSC) किंवा आयएएस स्पर्धा (IAS Success Story) परीक्षा म्हटलं की काही विशेष नावं समोर येतात, त्यातीलच एक नाव म्हणजे डॉक्टर तनु जैन. या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या तसेच इतर अनेक सामान्य लोकांमध्ये तनु जैन ह्या बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. युनियन पब्लिक सर्विस कमिशन( Union Service Public Comission) असं नाव केवळ youtube वर सर्च केल्यास तनु जैन यांचा व्हिडिओ सापडल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीतच तनु जैन हा चेहरा सर्वांना परिचयाचा आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या विविध मॉक इंटरव्यूज मधून लोकप्रिय झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक अशा तनु जैन या मुद्देसूद भाषण आणि बोलण्याचे तंत्रामुळे त्या समोरच्यावर प्रभाव पाडतात. सध्या डीआरडीओ( Defence Reserach and Development Organisation)मध्ये सहाय्यक संचालक पदावर त्या कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षा मधून उत्तीर्ण होत आपल्या देशाप्रती कार्य करण्याची इच्छा बाळगणाऱ्या अनेक तरुणांसाठी तनु जैन या प्रेरणास्थान आहेत चला तर जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल…

जन्म आणि शिक्षण

डॉक्टर जैन यांचा जन्म राजधानी दिल्लीचा गजबजलेल्या (IAS Success Story) भागात झाला. आत्ताच्या काळात स्पर्धा परीक्षांसाठी मनोबल वाढवणाऱ्या डॉक्टर जैन यांचे शाळेत मात्र अभ्यासात जेमतेमच लक्ष असायचे. अगदीच मध्यमवर्गीय कुटुंबातील तनुला खेळात मात्र फारच आवड होती व यामुळेच कधीही परीक्षेत अव्वल गुण मिळवण्यासाठी त्यांच्यावर कोणीही दबाव टाकला नाही. तनु जैन यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण दिल्लीतील केंब्रिज हायस्कूल मधून झाले आहे त्यानंतर त्यांनी मेरठ येथील सुभारती मेडिकल कॉलेज मधून बीडीएस(BDS) ही पदवी प्राप्त केली .बारावीनंतर बीडीएस साठी शिष्यवृत्तीचा फॉर्म भरताना तनु यांना सरकारी कर्मचारी आणि नागरी सेवा यांचे महत्त्व कळले आणि इथूनच त्या दृष्टीने मेहनत करण्यास त्यांनी सुरुवात केली.Tanu Jain IAS Success Story

IAS चा प्रवास

यूपीएससीची परीक्षा जेवढी वाटते तेवढीच कठीण आहे. मात्र डॉक्टर जैन यांनी केवळ दोन महिन्यांच्या तयारीत यूपीएससी प्रीलीम्स परीक्षा उत्तीर्ण केली. उत्तीर्ण झाल्यानंतरही त्यांनी अनेकदा ही परीक्षा दिली आणि प्रत्येक वेळी त्या यशस्वी झाल्या. एवढेच नाही तर चार वेळा त्यांनी यूपीएससीच्या मुलाखती (IAS Success Story) दिल्या आहेत. वर्ष २०१२ मध्ये डॉक्टर जैन यांनी पहिल्यांदा युपीएससीची परीक्षा दिली होती आणि प्रथमच फेरीत बाजी देखील मारली होती. २०१४ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांना इच्छेनुसार यश प्राप्त झाले त्यावेळी त्यांनी AIR 648 मिळवली होती. यानंतर त्यांना 2015 मध्ये सशस्त्र दल मुख्यालय सेवेत काम करण्याची संधी मिळाली.Tanu Jain IAS Success Story

सोशल मीडियावर ऍक्टिव्ह

सध्या त्या एक सुप्रसिद्ध नागरी सेवक आहेत आणि यूपीएससी परीक्षा देणाऱ्यांना त्या मार्गदर्शन करतात. आपले पती वात्सल्य पंडित(IAS) यांचा मदतीने त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिलेली आहेत. या व्यतिरिक्त डॉक्टर जैन यांची मॉक इंटरव्ह्यू पॅनल मधील महत्त्वाची सदस्य महिला म्हणून ओळख आहे. वाढत्या सोशल मीडियाच्या जगात डॉक्टर जैन यांचा देखील सक्रिय सहभाग जाणवतो. Instagram वर त्यांचे 80 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

IAS पतीची…साथ मोलाची

राजधानी दिल्ली येथे तथास्तु आयसीएस (Tathastu ICS) नावाचे आयएएस कोचिंग सेंटर त्यांनी स्थापन केले आहे. डॉक्टर तनु जैन म्हणतात की, “पूर्णवेळ नोकरीसह यूपीएससी परीक्षेची तयारी करणारे उमेदवार दररोज पाच तासांपेक्षा जास्त अभ्यास करू शकत नाहीत. परीक्षेची तयारी करत असताना (IAS Success Story) भावनिक सामाजिक अध्यात्मिक आणि नातेसंबंधांचा समतोल राखणे देखील आवश्यक आहे.” डॉक्टर तनु जैन यांना त्यांच्या कामात त्यांचे पती आयएएस वात्सल्य पंडित देखील खूप सहकार्य करतात. या दाम्पत्याला राजवर्धन नावाचा मुलगा देखील आहे. त्यांचे पती वात्सल्य स्वतः एक नागरी सेवक असून मोटिवेशनल स्पीकर देखील आहेत.Tanu Jain IAS Success Story

 

अन्य महत्वाच्या भरती  [upcoming vacancy 2023]

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023

NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023

BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023

MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI  !

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ