तुमचे चुकीचे निर्णय शिकवतात तुम्हाला डिसिजन मेकिंग तेजस्वी सातपुते IPS

0
1060
Tejaswini satpute IPS
Tejaswini satpute IPS Motivational stories

      साकेगाव आहे पाथर्डी तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील. तेजस्विनी सातपुते IPS यांचे छोटेसे गाव .(Tejaswini Satpute IPS Motivational Story) त्यांचा जन्म शेवगाव येथे झाला. शेवगाव  हा पाथर्डी वअहमदनगर यांच्या बॉण्ड्री वर असलेला जिल्हा. त्यांची आई प्राथमिक शिक्षिका होती. त्यांच्या आईने त्यांना अत्यंत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलीने शिस्तीने वागले पाहिजे असं तिला वाटायचं. त्या म्हणायच्या माझी शाळा दोन ठिकाणी भरायची. शाळेमध्ये आणि घरी आईच्या कडक शिस्ती मध्ये  आईला वाटायचं की मी सतत अभ्यास करावा.परिस्थितीचाही पलिकडे जाऊन अभ्यास करावा त्यामुळे त्यांची आई वेगवेगळी पुस्तके, व्यवसायमाला घरी आणायच्या.त्या मात्र आळशी होत्या. सकाळी कधी लवकर उठणार नाही. शाळेत उशिरा जाणार हे सगळं एका प्रसंगात पर्यंत चाललं होतं.

MPSC UPSC MOTIVATIONAL STORY IN MARATHI

                 चौथीला असताना त्यांच्या आईने जेव्हा दिवाळीच्या वेळेस सामान आवरायला काढलं तेव्हा त्यांना व्यवसायमाला सापडल्या. अगदी कोऱ्या त्यावर नाव टाकलेलं नव्हतं. तेव्हा त्यांची आई खूप चिडली. त्यांच्या बहिणीची पुस्तकही तशीच होती चार वर्षांनी लहान होती .आई म्हणाली हे पुस्तक वापरायचे असतील तर काय करायचं थंडी खूप पडली आहे. याची शेकोटी करूया तेव्हा दोघी हादरल्या. आईच्या हाता पाया पडू लागल्या त्यांनी आम्ही चार दिवसात त्या पूर्ण करू असं म्हणाल्या. सहा महिन्यांच्या उरलेल्या व्यवसाय मालात्यांनी  त्यांनी चार दिवसात पूर्ण केल्या. 

Tejaswini Satpute IPS Motivational Story

                त्यावेळेस चौथीला केंद्र परीक्षा असायच्या. त्यावेळेस  त्या केंद्रात दुसऱ्या आल्या होत्या. तेव्हा त्यांना वाटलं आपणही काहीतरी करू शकतो.चौथीला असताना पायलट निर्मलजीत सिंग चा धडा त्यांनी वाचला त्यांनी अत्यंत शौर्य गाजवलेल होतं, त्यांना वीर मरण आलं होतं आपणही पायलट व्हायचं व इतर जे करतात त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं असं त्यांनी ठरवलं काहीतरी वेगळं म्हणून पायलट व्हायचं त्यांनी ठरवलं. इतर लोक करतात त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं ठरवलं होतं .

             अकरावीला गेल्या आणि चष्मा लागला तेव्हा सर्व जण म्हणाले चष्मा लागला .आता पायलट  होता येणार नाही त्यामुळे बरेच वर्षे पाहिलेल त्यांचं स्वप्न खंडित झालं ज्या वयात मुलं स्वप्न पाहतात त्यावेळेस त्यांचं स्वप्न दिशाहीन झालं होतं.

                वर्तमानपत्रात जैवतंत्रज्ञान विषयी माहिती वाचली. जैवतंत्रज्ञानाची चौथी बॅच होती. काहीतरी वेगळं म्हणून त्यांनी त्यात ॲडमिशन घेतलं बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या बायो टेक्निकल कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं तेव्हा एक घटना घडली. बेंगलोर येथे एक संस्था होती . कॉलेज चालू असतानाच मुलांचे सिलेक्शन करून त्यांची शास्त्रज्ञ होण्याच्या दृष्टिकोनातून निवड करून त्यांना त्या दृष्टीने मार्गदर्शन करत होती संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांची एकटीची आणि भारतातून फक्त दहा जणांची निवड झाली होती. तेव्हा त्यांना वाटलं आपली वाटचाल योग्य दिशेने होत आहे. ती संस्था शास्त्रज्ञ घडवण्यासाठी प्रशिक्षण देत असे तिथे जाऊन तीन वर्षे त्यांनी खूप अभ्यास केला. पहिल्या वर्षी खूप उत्साह होता .सेकंड इयरला असताना खूप छान आहे पण आपल्यासाठी नाही. त्यामुळे थर्ड इयरला असताना ठरवलं एमएससी किंवा पीएचडी करायची नाही पण, करायचं काय हे देखील माहित नव्हतं. 

           त्यांच्याजवळ पर्याय होते एम ए किंवा एल एल बीकरणे किंवा सरळ गॅप घेणे. गॅप घेणे परवडणारं नव्हतं. ते 27 भावंडे होती एकत्र कुटुंबात राहत होती. त्यांच्या मोठ्या बहिणींची लग्न झालेली होती. कुटुंबातील त्या एकट्याच अशा होत्या की ज्यांना दहावी करू दिली होती, बारावी करू दिली होती ,ग्रॅज्युएशन करू दिले होतं आणि अशा परिस्थितीत गॅप घेणे म्हणजे एक वाया गेलेली मुलगी असा ठपका त्यांच्यावर लागणार होता, म्हणून काही केलं तरी गॅप घ्यायचा नव्हता म्हणून अगदी शेवटच्या दिवशी त्यांनी एल एल बी लाऍडमिशन घ्यायचं ठरवलं.

              फर्स्ट इयर ला असताना त्यांना खूप छान मार्क मिळाले .त्या युनिव्हर्सिटी मध्ये प्रथम आल्या काही मुलं वर्तमानपत्र वाचायची. सर शिकवत असताना ती वाचत राहायची . सर त्यांना बोलायचे त्यामुळे नकळत वर्गातील सर्वांचे लक्ष त्यांच्यावर जायचं त्यामुळे आम्ही एकदा त्यांना विचारलं तुम्ही एवढे काय वाचता वर्तमानपत्रात कारण पाच ते दहा मिनिटात साधारण वर्तमानपत्र वाचन होतं, तेव्हा ते म्हणाले आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम चा अभ्यास करतो. तेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्षेत्र पहिल्यांदा त्यांच्यासमोर आल .तेव्हा त्यांनी इंटरनेटवर माहिती काढली. पुण्यात गेल्यावर सर्वांचे क्लास उपलब्ध असतातच तेव्हा या साठी किती वर्ष लागतात किती कालावधी असतो हे कळालं माहिती काढल्यावर कळालं की यासाठी वर्षे वगैरे लागत नाही तर् attempt असतात. जो जेवढ्या attempt मध्ये  पास होईल तेवढ्या attempt मध्ये त्याला यश मिळतं. पुन्हा एकदा पायलेट नंतर हे क्षेत्र passionate वाटलं .त्यामुळे खूप अभ्यास करून आपण जर पहिल्या attempt मध्ये पास झालं तर लवकर अधिकारी होऊ असं त्यांना वाटलं.

             युपीएससीची परीक्षा, एलएलबी सेकंड ईयर ची परीक्षा एकाच वेळेस आली. त्यामुळे त्यांना डिसीजन घ्यायचा होता की यूपीएससी प्री एक्साम  द्यायची की एलएलबी सेकंड इयर ची परीक्षा द्यायची. त्यांनी यूपीएससी प्रिएक्झाम द्यायचं ठरवल. त्यांच्या समोर एक वेगळेच संकट होतं .घरच्यांना कसं convince करायचं .कारण चांगलं काहीतरी करायचं ठरवलं की ही क्षेत्र बदलते., बीएस्सी नंतर एमेस्सी करायचं सोडलं आणि LLB ला ऍडमिशन घेतलं आणि आता हे करत असतानाच competitive एक्झाम द्यायचं ठरवलं. घरच्यांना स्वप्न दाखवली होती की वकील होणार judge होणार आणि हे करत असताना जर मी स्वप्न दाखवली कलेक्टर होणार तर मला ते वेड्यात काढणार होते आणि झालेही तसेच परंतु त्या म्हणतात की मी ठाम निर्णय घेतला होता LLB न करता युपीएससीची परीक्षा द्यायचा. आईने नाराजी व्यक्त केली पण वडिलांनी पाठिंबा दिला ते म्हणाले तू विचार केला आहेस ना तेव्हा Go Ahead टेन्शन आल्यावर ते म्हणायचे तुला एक चांगला नागरिक बनावा म्हणून मी शिकवत आहे ,तू चांगली नोकरी करावी म्हणून नाही.तेव्हा सर्व टेन्शन जायचं आईला कन्व्हिन्स केलं मी जगाचा विचार केला नाही जग काहीही केलं तरी नाव ठेवणारच म्हणून ,ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या उक्तीप्रमाणे त्यांनी वागायचं ठरवलं .

            तेव्हा मुंबईमध्ये एक संस्था होती .जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणारे विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यामध्ये चांगले मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत त्या संदर्भात मार्गदर्शन करायची त्या परीक्षेमध्ये त्या पास झाल्या  व महाराष्ट्रातून दहाव्या नंबर वर आल्या त्यामुळे त्यांना मुंबईला मोफत माहिती व प्रशिक्षण मिळाले.पहिल्या attempt मध्ये काही पास झाले नाही. दुसऱ्या attempt ची  मेन्स परीक्षा ही नेमकी दिवाळीनंतर होती. तेव्हा हॉस्टेलमधील बरेच मैत्रिणी घरी गेल्या होत्या. स्वयंपाक बनवणारे मेसवाले घरी गेले होते. दिवाळीला सुट्टीवर गेले होते. त्यामुळे त्यादिवशी पाणी व पार्लेजी बिस्कीट खाल्ले होते .त्यावेळेची दिवाळी तशी साजरी केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात आज हा क्षण आला .यूपीएससीची परीक्षा तीन attempt मध्ये दिसत असली तरी त्यासाठी अभ्यास करतानाचा प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो. त्यावर्षी त्या pri पास झाल्या, mains पास झाल्या व इंटरव्यू मध्येही पास झाल्या. हे करत असताना त्या म्हणतात, वेगवेगळ्या टप्प्यांवर खूप सारी बलिदाने द्यावी लागली आणि ती बलिदान आपल्यासाठीच असतात.

विद्यार्थिदशेत असताना ते बलिदान अन्याय न समजता तेही करण्यात काहीतरी मजा आहे असं समजून काम केलं की त्याचा ताण होत नाही ते सुसह्य होतं संपूर्ण वर्षात त्यांना खूपदा वाटायचं की घरी आई वडिलांना भेटायला जावं पण त्या दोन ते तीन वेळेस गेल्या पण या दोन ते तीन दिवसात कोणाला उत्तर द्यावी लागू नयेत., तू काय करतेस, आता अजून किती वर्षे लागतील, मुलीचे वय वाढत चाललंय, तिचं लग्न कधी करायचं हे टाळण्यासाठी त्या मुंबईहून सकाळी निघायच्या आणि संध्याकाळी शेगावला पोहोचायचा रात्रभर जे काही चांगले असेल ते बोलायच्या. पहाटेच्या वेळेस पुन्हा मुंबईला येण्यास निघायच्या. त्यामुळे माणसांशी त्यांचा थेट संपर्क टाळला. मी प्रत्येक दिवशी परीक्षा दिली, जीव तोडून अभ्यास केला, खूप प्रलोभने यायची, त्यावर मात केली .असा विचार करायचे आई सकाळी पहाटे उठते ,स्वयंपाक करते, शाळेत जाते, पुन्हा घरी येते. दिवसभर दमली तरी संध्याकाळी काम करते, वडील रविवारी सुट्टी न घेता ही काम करतात हे कशासाठी तर आपल्या उज्वल भविष्यासाठी. हे सर्व आठवायच्या व प्रलोभनं वर मात करायच्या. त्या म्हणतात, मी घेतलेला निर्णय चूक की बरोबर  हे मला आता यश मिळालं म्हणून बरोबर वाटतील . पण यश मिळालं नसतं तरी सुद्धा मला ते चुकीचे वाटले नसते कारण मला प्रत्येक क्षेत्रांने खूप काही शिकवले आहे आणि मला या क्षेत्रात काम करताना घेतलेल्या शिक्षणाचा खूप फायदा झालेला आहे.

                  अशाप्रकारे आयुष्यात घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा नसतो. तर घेतलेल्या निर्णयावर आपण ठाम राहिले पाहिजे. जिद्दीने आणि चिकाटीने काम केले तर कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळतेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here