प्राचीन भारत नोट्स 2 – Ancient India Notes 2 For MPSC
Prachin Bharat , Vaidik Sanskruti Notes For MPSC Students
वैदिक संस्कृती
भारताच्या वायव्य भागात आणि पंजाबच्या सुपीक प्रदेशात वैदिक संस्कृतीचा विकास झाला. वेद ग्रंथांची निर्मिती करणारे म्हणून त्यांच्या संस्कृतीला ‘वैदिक संस्कृती’ असे म्हणत.
ऋग्वेद : ऋग्वेद हा वैदिक संस्कृतीचा – आयर्यांचा पहिला वेद. निसर्गाच्या विविध शक्तींना देव मानून त्याची स्तुती कवने आहेत. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ‘ ऋचा ‘ असे म्हणतात.
यजुर्वेद : यज्ञाविषयी माहिती देणारा हा ग्रंथ आहे. सामवेद : संगीताविषयीचे ज्ञान सामवेदात दिले आहे. अथर्ववेद : तत्त्वज्ञान , जीवनातील संकटे , पीडा यावर उपाय , औषधी वनस्पतींची माहिती.
ब्राह्मणग्रंथ : ब्राह्मणग्रंथांची रचना ही यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा , हे स्पष्ट करण्यासाठी झाली.
आरण्यके : आरण्यके म्हणजे अरण्यात जाऊन रचलेले ग्रंथ.
उपनिषदे : उपनिषद याचा अर्थ गुरूजवळ बसून मिळवलेले ज्ञान.
आर्थिक जीवन : गंगा , यमुनेच्या खोऱ्यात वसतिस्थान. शेती हा प्रमुख व्यवसाय. सातू , गहू , कापूस , भात , मोहरी इत्यादी पिके घेत. कृषिउत्पन्न वाढीबरोबरच व्यापारही वाढला. वस्तुविनिमय पद्धत रूढ होती. कृष्णल , मान , शतमान अशी वजने वापरत.
व्यवसाय : लोखंडाचा वापर वाढला. शेती उत्पन्नात वाढ. रथकार , सुतार , कुंभार इत्यादी कारागीर आधारस्तंभ होते. कुशल कारागिरांनी एकत्र येऊन संघटना बनवल्या. अशा संघटनांना ‘श्रेणी’ म्हणत .
राज्यव्यवस्था : राजा हा राज्याचा प्रमुख असे. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे, राज्याचा कारभार सुरळीत चालवणे ही राजाची मुख्य कर्तव्ये होती. ‘ग्रामणी ‘ हा गावाचा प्रमुख असे. ‘ग्रामवादी ‘ या अधिकाऱ्याच्या मदतीने गावाचा न्यायनिवाडा केला जात असे. अनेक ग्रामांच्या समूहाला ‘विश्’ म्हणत . त्यावरील अधिकाऱ्याला ‘ विश्पती ‘ म्हणत.
वैदिक काळातील लोकजीवन
वर्णव्यवस्था : या काळात समाजात ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. जातिव्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली.
कुटुंब व्यवस्था : वैदिक काळातील समाज पितृप्रधान होता. त्यामुळे स्त्रियांचे स्थान दुय्यम होते . मुलींना शिक्षण घेण्यास परवानगी होती. गार्गी , मैत्रेयी , लोपामुद्रा इत्यादी विद्वान स्त्रियांचे वाङ्मय आढळते. नंतरच्या काळात स्त्रियांवरील बंधने कडक केली. त्यामुळे स्त्रियांची स्थिती खालावली.
आश्रमव्यवस्था :
( १ ) ब्रह्मचर्याश्रम – अभ्यास करून विद्या संपादन करणे .
( २ ) गृहस्थाश्रम – कुटुंबाचे पालन – पोषण करणे , धार्मिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडणे.
( ३ ) वानप्रस्थाश्रम – कुटुंबाची जबाबदारी मुलांकडे सोपवून निवृत्त होणे.
( ४ ) संन्यासाश्रम – आयुष्याच्या अखेरीस मनुष्याने चिंतनात जीवन कंठावे.
दैनंदिन जीवन : बहुतेक लोकांची घरे मातीची , कुडाची असत. शहरातील घरे लाकडाची असत. लोकांच्या आहारात दूध , दही , तूप , मांस , फळे , धान्ये यांचा समावेश असे . वैदिक काळातील लोक लोकरी व सुती वस्त्रे वापरत. फुलांच्या माळा व दागिने वापरत. ‘ निष्क ‘ हा दागिना लोकप्रिय होता. गायन , वादन , नृत्य , सोंगट्यांचा खेळ ही त्यांची मनोरंजनाची साधने होती.
धर्मकल्पना : वैदिक काळातील लोकांना सूर्य , वारा , पाऊस , नद्या , वीज , वादळे यांबद्दल कुतूहल होते. या शक्तींची प्रार्थना केली जात असे. देवाला प्रसन्न करण्यासाठी नैवेद्याची कल्पना रूढ झाली. नैवेद्य पोचवण्याचे काम अग्नी करतो, अशी कल्पना रूढ झाली . नैवेद्यास ‘ हवि ‘ म्हणत. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या ऋषि – मुनींनी सगळी सृष्टी एकाच मूळ तत्त्वापासून निर्माण झाली, असे सांगितले. या तत्त्वाला त्यांनी ‘सत्’ असे म्हटले. कोणत्याही नावाने उपासना केली तरी ‘सत्’ रूपी ईश्वराकडे जाते, अशी कल्पना रुजल्यामुळे धार्मिक सहिष्णुता रुजण्यास मदत झाली.