कठीण परिस्थिती सोबत लढून वंदना चौधरी यांनी मिळवले MPSC success
वयाची पस्तिशी ओलांडल्यानंतर वंदना चौधरी यांनी MPSC परीक्षा देण्यास सुरुवात केली वंदना चौधरी या BAMS डॉक्टर आहेत त्यांनी वयाच्या 37 व्या वर्षी पहिल्यांदा एमपीएससी परीक्षा दिली आणि वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी त्यामध्ये यश मिळवलं व क्लास वन पद मिळवले.
डॉक्टर वंदना प्रशांत चौधरी या औरंगाबाद येथील वैजापूर गावच्या रहिवासी आहेत त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी होती. त्या दोघी बहिणी व दोन भाऊ आई वडील असे त्यांचे कुटुंब होते. लहानपणी आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे मोठ बनायचं असेल तर अभ्यास करण्याला गत्यंतर नाही, त्यामुळे जिद्दीने अभ्यास करणारी ही सारी भावंडं त्यांच्या मोठ्या भावाने स्कॉलरशिप च्या जोरावर इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. भावाने दाखवलेली दिशा व योग्य मार्गदर्शन यामुळे त्या दोघी बहिणी व लहान भाऊ तिघेही डॉक्टर झाले.
डॉक्टर वंदना यांनी नांदेड येथील शासकीय महाविद्यालयातून बीएएमएस ची पदवी मिळवली त्यानंतर प्रॅक्टिस केली. त्यानंतर लग्न, लग्नानंतर मुलगी अशा पद्धतीने त्या आपल्या संसारीक जीवनात रममाण झाल्या होत्या. त्यांची वैद्यकीय प्रॅक्टीस चालू होती अडचणी छोट्यामोठ्या येत होत्या पण त्या अडचणींवर त्यांनी मात करत पुढे वाटचाल सुरु ठेवली.
2014 सली वैजापूर गावात दुष्काळ पडला. पेशंटची संख्या रोडावली. त्यामुळे वेळ मिळत गेला. फावल्यावेळात त्यांनी भरपूर पुस्तके वाचली. पुस्तके वाजता वाजता स्पर्धा परीक्षेचे पुस्तक हाती लागलं व त्या शून्यात हरवल्या .त्यांच्या मिस्टरांनी त्यांना विचारलं का गं काय झालं तेव्हा त्या म्हणाल्या, मलाही लहानपणी वाटायचं अभ्यास करावा .मोठा अधिकारी व्हावं पण काळाच्या ओघात यापूर्वीच राहिलं तेव्हा त्यांचे मिस्टर म्हणाले अगं लहानपणी स्वप्न अपुरं राहिलं म्हणून काय झालं .आता तू ते पूर्ण कर त्यांना हसूच आलं त्या म्हणाल्या आता कसं शक्य आहे. तेव्हा तर त्यांनी वयाची पस्तीशी ओलांडली होती .कशी परीक्षा देणार कधी अभ्यास करणार, कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या, क्लिनिक होतं आणि इतरही अनेक अडचणी होत्या; त्याचबरोबर नवीन स्मार्ट पिढी होती, त्यांच्याशी मी कशी compitition करणार असे प्रश्न त्यांनी विचारले तेव्हा त्या मिस्टरांना म्हणाल्या, नाही हो शक्य. पण ते म्हणाले,” अगं प्रयत्न करायला काय हरकत आहे ;तू अभ्यास केला तर यश व पद नाही मिळालं तर ज्ञान तर मिळेल ना”.
त्यानंतर त्यांनी परीक्षेविषयी माहिती काढायला सुरुवात केली. ओबीसी कॅटेगरी साठी तेव्हा वयाची मर्यादा 38 वर्षे होती त्यामुळे त्यांच्याकडे दोन attempt होते. तोपर्यंत एमपीएससीची जाहिरात आली नव्हती. त्यामुळे जाहिरात निघेपर्यंत जी सरळ सेवा भरती ची परीक्षा आहे त्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून त्यांनी जळगाव जिल्ह्यातील तलाठी पदासाठी application केलं. जळगाव जिल्ह्यात मुलींमध्ये प्रथम आल्या व ते पद त्यांना मिळालं सगळे म्हणाले एका महिन्याच्या अभ्यासामध्ये हे पद मिळालं तर आणखीन अभ्यास केल्यावर अधिकारी होशील. आता तू पुढच्या परीक्षा दे. सर्वांनी त्यांचं खूप कौतुकही केलं. त्यांनी समाज कल्याण निरीक्षक परीक्षा दिली ते पद मिळालं .
विक्रीकर निरीक्षक, महिला बालकल्याण या परीक्षा दिल्या त्यामध्येही त्या पास झाल्या .त्यानंतर 2015 साली राज्यसेवा मेन्स दिली त्यामध्ये त्यांना नायब तहसीलदार हे पद मिळालं. त्यामुळे आत्मविश्वास वाढला त्यांनी ठरवलं की आता Class 1 झाल्याशिवाय थांबायचं नाही .अभ्यास सुरू ठेवला पण आयुष्यात सर्व गोष्टी सुरळीत चालतात असं नाही. 2016साली त्यांच्या आयुष्यात pri _ exam च्या अगोदर संकट आलं. त्यांचे लहान दीर सिझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त होते. ते नेहमी त्यांच्या आई-वडिलांवर म्हणजे सासू-सासर्यांना वर चिडायचे, मारायचे . एक दिवस असंच त्यांनी त्यांच्या आईला म्हणजेच डॉक्टर वंदना यांच्या सासूबाईंना मारलं डोक्याला खूप मार लागला. त्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण , औषध पाणी करणं, त्यांची सेवा सुश्रुषा करणं, यामुळे त्यांना अभ्यासाकडे लक्ष देता आले नाही. परिणामी 2016 सालच्या pri exam मध्ये त्यांना यश मिळाले नाही.
डॉक्टर वंदना यांच सदैव म्हणा, जिद्द म्हणा किंवा तीव्र इच्छाशक्ती म्हणा., एमपीएससीने परीक्षार्थींची वयोमर्यादा वाढवली. जनरल कॅटेगिरी साठी 38 वर्षे व इतर कास्ट ओबीसीसाठी 43 वर्षे. त्यामुळे त्यांना तब्बल पाच attempt मिळणार होते. डॉक्टर वंदना यांना एकच Attempt पुरेसा होता. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आता मिळालेल्या संधीचं सोनं करायचं.
2017 सालच्या परीक्षेत यश मिळवायचं व क्लासवन ची पोस्ट मिळवायची. म्हणून त्यांनी जिद्दीने अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांचं काम चालू होतं, अभ्यास चालू होता. रेल्वेमध्ये लंच ब्रेक मध्ये वेटिंग रूम मध्ये अभ्यास एके अभ्यास त्या करायचा .त्यांना सुदैवाने मैत्रिणींचा ग्रुप ही चांगला मिळाला. ग्रुप डिस्कशन करायच्या त्यामुळे नवीन पुस्तकांची माहिती मिळाली. अभ्यासक्रमावर फोकस केला. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्या त्यामुळे त्यांचा अभ्यास To the point होता. या वर्षी नक्की क्लास वन ऑफिसर होईल. यामुळे त्यांना आत्मविश्वास वाटत होता आणि झालेही तसेच pri exam मध्ये त्यांचा स्कोर 200 प्लस आला. त्यामुळ त्या Main exam साठी क्वालिफाईड होत्या.
अपडाऊन मध्ये वेळ जात असल्यानं एप्रिल मध्ये त्या औरंगाबादला शिफ्ट झाल्या. ऑफिस सुटल्यानंतर म्हणजे सहानंतर व ऑफिस च्या अगोदर 10 च्या अगोदर त्यांनी फक्त अभ्यास एके अभ्यास केला. नवीन पुस्तके नवीन पॉईंट्स काढले. ऑगस्ट पर्यंत त्यांचा मेन्स चा अभ्यास पूर्ण झाला होता. सप्टेंबर मध्ये रिविजन करायची आणि परीक्षा द्यायची असं ठरवलं होतं .त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता त्यांचं दुर्दैव असं त्यांचे सासरे आठ सप्टेंबर रोजी पडले आणि सतरा-अठरा सप्टेंबरला त्यांची मेन्स परीक्षा होती. डोक्याला मार लागला होता.
व्हेंटिलेटरवर होते खूप सिरीयस होते .त्यामुळे त्यांचे लक्ष काही अभ्यासात लागेना. परीक्षा जवळ आलेली त्यावेळेस त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना खूप धीर दिला. तू खचू नकोस ,त्यांना त्यांची सून अधिकारी झालेली पाहायची आहे. तू परीक्षा दे रिविजन वर भर दे परीक्षा दिली पण त्यातच सासऱ्यांचे निधन झालं. एक-दीड महिना त्यात गेला. मेन्स मध्ये त्यांना चांगला स्कोर मिळाला होता. त्यामुळे त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी सुरू केली परंतु दुर्दैव काही पिच्छा सोडत नव्हतं त्यांच्या सासूबाई आजारी पडल्या. तपासणीअंती निष्कर्ष आला की त्यांना कॅन्सर झाला होता आणि तो थर स्टेजला होता. तेव्हा त्या दोघा नवरा बायकोला खूप धक्का बसला .दोघेही खूप खचले. अगोदरच सासरे गेलेल्याला चार-पाच महिने झाले होते आणि त्यात सासुबाई आजारी त्यामुळे त्यांना काहीच सुचेना, त्यामुळे सासूबाईंना दवाखान्यात नेण, cemiotherapy करणं, औषध पाणी देणे यामुळे त्यांच इंटरव्यू इ.
कडे दुर्लक्ष झालं. इंटरव्ह्यूची तयारी करावीशी वाटेना त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी करणं सोडूनच दिलं. त्यांच्या सासूबाई समजावत होत्या तू वेळ वाया घालू नकोस अभ्यासाकडे लक्ष दे. मी ठीक होईल ही संधी वाया घालवू नकोस. ही संधी पुन्हा मिळणार नाही. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तुझी मेहनत वाया घालू नकोस .डॉक्टर वंदना यांनी इंटरव्यू दिला तो चांगला गेला व त्यात त्यांना हवी ती पोस्ट मिळाली. त्यात त्यांना ACS हे पद मिळालं असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट त्यांनी घेतलं त्यांना खूप आनंद झाला. सर्वांनी त्यांचं कौतुक केलं .सासुबाई कृतार्थ झाल्या .वेदनेमध्येही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि हा क्षण सर्वांसाठीच खूप आनंदाचा होता. तीन चार वर्षाच्या मुलीने तिला यश मिळालं फळ मिळालं त्यानंतर थोड्याच दिवसात सासूबाईंच निधन झालं . त्यांच्या मिस्टरांनी एकाच वर्षात आई-वडील दोघांना गमावलं. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले. त्यामुळे त्या म्हणाल्या आता मला त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी खंबीर व्हायचा आहे त्यांना डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले .आई-वडिलांना तर आपण परत आणू शकलो नाही पण त्यांची स्वप्ने तर आपण पूर्ण करू शकतो हे त्यांनी समजावलं.
या काळात त्यांना अनेक महिलांचे फोन येऊ लागले. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ लागल्या आपण जर एखादी गोष्ट मनात आणली तर आपण काहीही करू शकतो. प्रत्येकामध्ये एक Potential असतं. प्रयत्नच केले नाहीत तर कसे कळणार की आपणा मध्ये ती क्षमता आहे की नाही. क्षमतेच्या शंभर टक्के प्रयत्न केले तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो .स्पर्धा ही आपली स्वतःचीच असली पाहिजे. कालच्यापेक्षा आज better व आजच्यापेक्षा उद्या best केले पाहिजे. कोणतेही क्षेत्र असो प्रयत्न केले ,कष्ट केले की नक्कीच यशस्वी होऊ शकतो. प्रत्येकाने मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे.