Vidhwa Pension Yojana 2023 :विधवा पेंशन योजना महाराष्ट्र 2023 

0
41
Vidhwa Pension Yojana 2023
Vidhwa Pension Yojana 2023

Vidhwa Pension Yojana 2023

Vidhwa Pension Yojana 2023:नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना,महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व प्रवर्गातील महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये विधवा महिलांसाठी Vidhwa Pension Yojana, महिला उद्योजक योजना, महिला सन्मान योजना, महिला बचत गट योजना अशा विविध महिला योजनांचा समावेश आहे. विधवा महिलांसाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या विधवा पेन्शन योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

योजना संपूर्ण नाव महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना
कोणामार्फत सुरू महाराष्ट्र शासन
विभाग महिला कल्याण विभाग
लाभार्थी वर्ग पात्र विधवा महिला
राज्य महाराष्ट्र
लाभ स्वरूप रू. स्वरूप आर्थिक मदत
श्रेणी विधवा पेन्शन
अर्ज प्रक्रिया ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

विधवा पेंशन योजना काय आहे ?

एखाद्या महिलेच्या पतीचा आकस्मित किंवा अन्य कारणास्तव मृत्यू झाल्यानंतर महिलांना कोणताही आधार मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन, विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व स्वबळावर आपलं आयुष्य जगण्यासाठी राज्यशासनाच्या महाराष्ट्र महिला कल्याण विभागाकडून विशेष विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विधवा महिलांना दरमहा 1,000 रु. पेन्शन दिलं जातं.

विधवा पेंशन योजना राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील विधवा महिलांसाठी खास महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. या पेन्शन योजनेचा मुख्य हेतू पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलांना समाजात उंच मान करून जगता यावं आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या पेन्शन रकमेमुळे कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या मूलभूत गरजा भागवता याव्यात हा आहे. तर चला पाहूयात, इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना ऑनलाइन फॉर्म कसा भरावा ? विधवा पेंशन योजना कागदपत्रे कोणती लागतील ?

विधवा निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्रता

  • अर्जदार विधवा महिला महाराष्ट्र राज्याच्या कायमचा रहिवासी असाव्यात.
  • अर्जदारांच बँक अकाउंट आधार कार्डसोबत जोडलेलं असाव. (NPCI Linking)
  • विधवा अर्जदार महिला दारिद्र्यरेषेखाली असल्यास त्यांना विशेष प्राधान्य देण्यात येईल.
  • अर्जदार विधवा महिलांचा वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयांपेक्षा जास्त नसावं.
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विधवा महिलांची वयोमर्यादा जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असावी.

विधवा पेंशन (पेन्शन) योजना उद्दिष्ट

खेड्यापाड्यात पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात पत्नीला आणि मुलांना कोणताही दुसरा आधार नसतो; परिणामी त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होत जाते. यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कोणता तरी उपाय केला पाहिजे; हा मोलाचा विचार बाळगून महाराष्ट्र शासनाकडून महिलांना दरमहा 1,000 रुपये (अंदाजित) देण्यासाठी विधवा पेंशन योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आधार नसलेल्या राज्यातील गरीब, निर्धन व विधवा महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करताना चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी स्वावलंबी बनवणे हा आहे.

महिला विधवा पेंशन योजना लाभ/फायदा

शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या विधवा पेंशन योजनेचा फायदा महाराष्ट्र राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. विधवा महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या सरकारी योजनेचा खालील प्रमाणे फायदा पाहू शकता.

  • विधवा पेन्शन योजनेच्या माध्यमातून दरमहा महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना 600 रुपये इतका मानधन, निवृत्तीवेतन, पेन्शन दिलं जातं.
  • समजा एखाद्या कुटुंबातील लाभार्थी विधवा महिलेला एकापेक्षा जास्त मुलं असतील, तर अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबातील महिलेला दरमहा वाढू रक्कम दिली जाते. अंदाजित 900 रु.
  • जर संबंधित महिलेला फक्त मुली असतील, तर अशा स्थितीत मुलगी 25 वर्षाची होईपर्यंत किंवा मुलीचे लग्न झाल्यापासून हा फायदा कायमस्वरूपी असेल.
  • विशेष म्हणजे शासनाकडून मिळणारे हे पेन्शन किंवा अनुदान विधवा महिलांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.

विधवा पेंशन योजना कागदपत्रे (Documents)

  • अर्जदार विधवा महिलाचा आधार कार्ड
  • गॅस कनेक्शन असल्यास पुरावा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • वयाचा पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला
  • पतीचा मृत्यू प्रमाणपत्र
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • मोबाईल क्रमांक
  • पत्त्याचा पुरावा
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)

Vidhwa Pension Yojana Form PDF Maharashtra

तुम्हाला जर इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र अंतर्गत या योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास तुमच्याजवळ तहसील कार्यालय या ठिकाणी भेट देऊन सदर योजनेचा Pdf Form प्रिंट करून त्यावरील सर्व मूलभूत माहिती भरून आवश्यक कागदपत्रासह कार्यालयात जमा करावा लागेल.

Vidhwa Pension Yojana List Maharashtra

विधवा पेन्शन योजनेची संपूर्ण कार्यप्रणाली शासकीय असल्यामुळे वैयक्तिक व्यक्तींना याची यादी (List) ऑनलाईन वेबसाईटवरती किंवा इतरत्र मिळणार नाही. त्यासाठी तुमच्या गावातील संबंधित तलाठी किंवा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून तुम्ही विधवा पेन्शन योजनेची संपूर्ण यादी मिळवू शकतात.

विधवा महिला योजना महाराष्ट्रसाठी अर्ज कसा करावा ? (apply online)

सदर योजनेसाठी फक्त आपले सरकार पोर्टल वरून आँनलाईन किंवा ऑफलाईन Apply करता येईल; परंतु त्यासाठीसुद्धा संबंधित कार्यालयाला भेट द्यावी लागेल, त्यामुळे सर्वप्रथम पात्र व लाभार्थी विधवा महिलांना संबंधित योजनेचा अर्ज नमुना म्हणजेच अर्ज pdf प्रिंट काढून त्यावरील सर्व माहिती योग्य व व्यवस्थितरित्या भरून त्या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडून जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, तलाठी कार्यालय याठिकाणी जमा करावा लागतो. त्यानंतर संबंधित अर्जदार पात्र असतील, तर पुढील काही दिवसात अर्जदारांना याबाबतची माहिती दिली जाते.

Form Pdf (अर्जाचा नमुना) येथे क्लिक करा
शासन निर्णय (GR) येथे क्लिक करा

विधवा महिलांसाठी राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली विधवा पेन्शन योजना खरंच निराधाराना खूपच लाभदायक ठरत आहे; कारण या धावपळीच्या युगात आपला साथीदार सुटल्यानंतर इतर कोणीही आपल्याला आर्थिक मदत करत नाही; परिणामी दैनंदिन मानसिक स्थिती बदलत जाते आणि मुला-बाळांना सांभाळण्याची जबाबदारी वाढत जाते; परंतु शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या या पेन्शन योजनेमुळे जास्ती फार मदत होत नसली तरी नक्कीच “बुडत्याला काठीचा आधार” या उक्तीप्रमाणे महिलांना लाभ मिळत आहे.

विधवा पेन्शन योजना काय आहे ?

विधवा महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी अर्थसाह्य योजना होय.

Vidhwa Pension Yojana कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

विधवा पेंशन योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

विधवा पेंशन योजनेसाठी कोणत्या महिला अर्ज करू शकतात ?

दारिद्र्यरेषेखाली असलेल्या निर्धन व विधवा महिला सदर योजनेसाठी अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र विधवा पेंशन योजना योजनेअंतर्गत महिलांना दरमहा किती रुपयांचं अनुदान किंवा आर्थिक मदत केली जाते ?

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेच्या माध्यमातून शासनाकडून महिलांना दरमहा 1000 रु. (अंदाजित) इतकी मदत केली जाते.

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.

सूचना –  MPSCWORLD.In  या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे.  उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या  मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात . 

वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

 

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

 

 आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

पुणे मुंबई कोल्हापूर
अहमदनगर अकोला अमरावती
औरंगाबाद बीड भंडारा
बुलढाणा चंद्रपूर धुळे
गडचिरोली गोंदिया हिंगोली
जळगाव जालना वर्धा 
लातूर नांदेड नंदुरबार
नाशिक उस्मानाबाद परभणी
पालघर रायगड रत्नागिरी
सांगली सातारा सिंधुदुर्ग
सोलापूर ठाणे नागपूर
वाशीम यवतमाळ