Yashwantrao Chavan Gharkul Yojana : यशवंतराव चव्हाण मुक्त (घरकुल) वसाहत योजना
या योजनेसाठी कुटुंबांना खालीलप्रमाणे प्राधान्य
Yashwantrao Chavan Gharkul Yojana:या योजनेअंतर्गत सामान्यतः पालात राहणाऱ्यांना, गावोगावी भटकंती करून उपजीविका करणाऱ्याला, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला त्याचप्रमाणे घरात कोणीही कामावर नाही, अशा विधवा परित्यकत्या किंवा अपंग महिला पूरग्रस्त क्षेत्र बाधित लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येईल.
घटकुलासाठी किती पैसे मिळतात ?
- घरकुलसाठी निवड झालेल्या लाभार्थी अर्जदारांना या योजनेअंतर्गत कुटुंबास प्रत्येकी 5 गुंठे जमीन देऊन त्यांना 269 चौरस फूटचे घर बांधून दिले जाते. उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबास शासकीय योजनाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.
- लाभार्थ्यांना देण्यात आलेली जमीन कोणालाही विकता येणार नाही किंवा भाडेतत्त्वावर देता येणार नाही.
- प्रत्येक वर्षी राज्यातील 34 जिल्ह्यातील (मुंबई व बृहन्मुंबई वगळून) प्रत्येकी तीन गावांची निवड करून त्या गावातील कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

यशवंतराव चव्हाण मुक्त (घरकुल) वसाहत योजना :इथे क्लिक करा
यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या अटी
- अर्जदार कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- अर्जदाराकडे स्वतःच्या मालकी हक्काच घर नसावं.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदार सध्या स्थितीमध्ये कच्च्या घरात किंवा झोपड्यांमध्ये राहणारा असावा.
- अर्जदार किंवा लाभार्थी कुटुंबामार्फत यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा राज्य शासनाकडून लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी कुटुंब भूमिहीन म्हणजेच बिगर जमीनधारक असावेत.
- या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच पात्र व्यक्तीस मिळेल.
- यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ही फक्त राज्यातील ग्रामीण भागासाठीच लागू आहे.
- लाभार्थी सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एकाच ठिकाणी वास्तव्यास असावा.
- दहा पात्र लाभार्थी कुटुंबासाठी या योजनेअंतर्गत जागा मिळत असल्यास योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल.
- 20 कुटुंबासाठी एक हेक्टर जमीन उपलब्ध होत नसल्यास सदर योजनेच्या नियमांमध्ये किंवा अटीमध्ये शिथिलता आणण्याचा अधिकार तालुका स्तरावरील समितीस आहे.
- अर्जदारांना घरकुल योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत अर्जदार वैयक्तिक लाभ मिळवू शकतात.
अर्ज कुठे करावा ?
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राज्याच्या समाजकल्याण विभागाकडून राबविली जात असल्याने, पात्र लाभार्थी अर्जदारांना संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाला भेट द्यावी. योजनेसंदर्भातील अधिक चौकशी करून समाजकल्याण कार्यालयामध्ये सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज दाखल करावा लागेल.Yashwantrao Chavan Gharkul Yojana
1)यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कोणत्या समाजासाठी आहे ?
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अनुसूचित जाती-जमाती या समाजातील नागरिकांसाठी आहे.
2)यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
3)यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो का ?
नाही, ही योजना संपूर्णता सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येत असल्यामुळे अर्जदारांना ऑफलाइन पद्धतीने समाजकल्याण विभागाकडे अर्ज करावा लागतो.
4)यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलासाठी किती अनुदान दिलं जातं ?
यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत डोंगराळ भागातील लाभार्थ्यांसाठी 1.30 लाख रु. तर सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी 1.20 लाख रु. इतक अनुदान देय आहे.
📢 महत्त्वाची माहिती
✅या पद्धतीने ऑनलाईन पैसे पाठविल्यास द्यावा लागणार चार्ज | UPI Payment !!
✅Govt Jobs:8, 10 वी उत्तीर्णांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांकरिता भरती

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.