महत्त्वाचे – जिल्हा परिषदेमध्ये 15 सप्टेंबरपासून कर्मचारी भरती प्रक्रिया राबविल्या जाणार!! | ZP Bharti 2022
Zilla Parishad Bharti 2022
Zilla Parishad Bharti 2022
अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत १५ सप्टेंबरपासून कर्मचारी भरती प्रक्रिया राबविल्या जाणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया आधी पदोन्नतीने भरावयाची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे जि. प. आरोग्य सेवा कर्मचार्यांच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला लवकरच जिल्हा परिषद भरती परीक्षांच्या तारखा जाहीर होतील.
अन्य महत्वाच्या भरती
✅7 वी, 12 वी व इतर उमेदवारांना संधी; बाल संरक्षण संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू | UT Administration Daman & Diu Bharti 2022
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती | SECR Nagpur Bharti 2022
✅खुशखबर!! भारतीय लष्कर अग्निवीर (जनरल ड्युटी) महिला भरती रॅली नोटिफिकेशन जाहीर!! Agniveer Women Bharti 2022
✅10 वी, ITI उत्तीर्णांना संधी!! सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये 1635 रिक्त पदांची भरती | BSF Bharti 2022
✅खुशखबर!! रेल्वेत लवकरच 1.4 लाख लोकांना रोजगार!! Indian Railways Bharti 2022
Zilla Parishad Bharti 2022
अमरावतीजिल्हा परिषद भरती प्रक्रिया 15 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. 06 जुलै 2022 रोजी महाराष्ट्रातील ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद भरतीमधील सद्यस्थिती आणि भरतीप्रक्रीयेमधील पुढील कार्यवाही या विषयावर मीटिंग घेण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदा जि. प. भरती परीक्षांच्या तारखा जाहीर होतील. यासंदर्भातील सर्व अपडेट या लेखात दिले आहे. सोबतच महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती बाबत महाराष्ट्र शासनाने 10 मे 2022 रोजी नवीन शासन निर्णय जाहीर करून जिल्हा परिषद भरती संदर्भात update (Maharashtra ZP Bharti 2022) दिला होता. मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील पदे भरण्याचा आदेश दिनांक 14 जून, 2021 दिला होता. पण परीक्षा झाली नव्हती. आता या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत एक शासन निर्यय (Maharashtra ZP Bharti 2022) प्रसिद्ध करण्यात आला होता. ज्यात Maharashtra ZP Bharti 2022 ची परीक्षा ही जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात येईल असे सांगितले होते व महाराष्ट्र जिल्हा परिषद भरतीची परीक्षा येत्या काही दिवसात होणार आहे. आज या लेखात आपण Maharashtra ZP Bharti 2022 Update बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
आरोग्य भरतीमधील गैरप्रकार प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या न्यास कम्युनिकेशन प्रा. लि. याकंपनीकडे जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५२१ पदांसाठी अर्ज करणाऱ्या जवळपास वीस लाखांहून अधिक अर्जदारांची सर्व माहिती (डेटा) आहे. मात्र, पदभरतीसाठी जिल्हा परिषदांनी न्यास कंपनीकडून ही माहिती गोळा करावी, असा शासनादेश काढून ग्रामविकास विभागाने भरती प्रक्रियेमध्ये खोडा घातला आहे. आरोग्य भरतीमधील गोंधळानंतर न्यास कंपनीचे कार्यालयही मूळ ठिकाणी नसून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी माहितीसाठी संपर्क केला असता टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या चुकीच्या शासनादेशाचा फटका भरती प्रक्रियेला बसला असून २० लाख उमेदवार अद्यापही पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्हा परिषदेकडील गट ‘क’ मधील १८ संवर्गातील १३ हजार ५१४ पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी महाआयटीमार्फत मार्च २०१९मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर महापरीक्षा संकेतस्थळावर मार्च २०१९ मध्ये २० लाखांवर उमेदवारांनी यासाठी अर्ज केले. एका उमेदवाराने तीन ते चार हजार रुपये खर्च करून विविध पदांसाठी अर्ज केलेत. मात्र, महापरीक्षा संकेतस्थळावरील गोंधळानंतर शासनाने ते बंद करून नव्याने ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदेतील भरतीचे काम न्यास कंपनीला दिले. त्यानुसार या कंपनीने मधल्या काळात आरोग्य विभागाची भरती घेतली.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.