ZP Nashik Bharti 2023
ZP Nashik Bharti 2023:ZP Nashik Recruitment 2023:ZP Nashik 2023 apply online :ZP Nashik Recruitment 2023-2024:ZP Nashik 2023: upcoming Nashik Pune recruitment 2023-24:ZP Nashik Job 2023
ZP Nashik Bharti 2023:नमस्कार मित्रांनो, खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची भरती,जिल्हा परिषद नाशिकच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील अंतर्गत “ आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).” पदाच्या 1038 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३. आहे.
पदाच्या आवश्यकतेनुसार उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. या सुवर्ण संधीचा फायदा घेत,तुम्ही लवकरात लवकर तुमचा अर्ज सादर करावा.आपण वरील भरतीसाठी योग्य उमेदवार असाल, तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून लवकर अर्ज करा.
Zilla Parishad Nashik Bharti 2023
- पदाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
- पद संख्या – 1038 Posts
- शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
- अर्ज पद्धती –ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
- परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
- वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
झेडपी नाशिक भरती शैक्षणिक पात्रता 2023 | शैक्षणिक पात्रता
पोस्टचे नाव | शैक्षणिक पात्रता |
फार्मासिस्ट | औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार |
आरोग्य कर्मचारी (पुरुष) (आरोग्य सेवक) | विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. |
आरोग्य कर्मचारी (महिला) | ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेम नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील |
Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक) | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. |
ग्रामसेवक (ग्रामसेवक) | किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम |
कनिष्ठ अभियंता (GPP) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)) | यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत)) | विद्युतअभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (L.P.)) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
कनिष्ठ ड्राफ्ट्समन | माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र |
कनिष्ठ लेखाधिकारी | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणान्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा है। प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा | उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल. |
कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा | घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार |
Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार |
ट्यूना (जोडारी) | जे उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील ज्यांना किमान दोन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असेल, शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडाऱ्याचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील. |
इलेक्ट्रिशियन | महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार |
पर्यवेक्षक | ज्या महिला उमेदवारांनी एखादया संविधिक विद्यापीठाची, खास करुन समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे. |
पशुधन पर्यवेक्षक | संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी । धारण करीत असलेल्या व्यक्ती, किंवा पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. पशुधन पर्यवेक्षक त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम |
Laboratory Technician Mechanics (प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी) | ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. |
रिगमन (रिग्मन) | शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा, जड वाहन कामाचा वैध परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा. |
लघुलेखक (उच्च श्रेणी) | महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक |
लघुलेखक (निम्न श्रेणी) | महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक |
वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) | पदवीधर |
वरिष्ठ सहाय्यक खाती | पदवीधर व 03 वर्षाचा अनुभव |
विस्तार अधिकारी (कृषी) | ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. |
विस्तार अधिकारी (पंचायत) | जे उमेदवार विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील असे उमेदवार परंतू ग्रामीण समाजकल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमांचा तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य |
विस्तार अधिकारी (शिक्षण) | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, |
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) | संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, | अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्ष कंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण आलेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा 3) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर वेक्षक), 4) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर धारण करत असलेला उमेदवार |
Zilla Parishad Nashik Required Age Limit – वयोमर्यादा
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. सनिव २०२३/प्र.क्र.१४/कार्या/१२, दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
दि. ०३ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार दि. २५ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाळी ४५ वर्षे) देण्यात आलेली आहे.
ज्या पदासाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी देखील दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत देण्यात आलेली शिथिलता ही दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच लागू राहिल.
सामाजिक व समांतर आरक्षण निहाय वयोमर्यादा
दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीचे उमेदवाराचे वय ग्राह्य धरणेत येईल.
ZP नाशिक वयोमर्यादा 2023 |
|
सर्वसाधारण प्रवर्ग | 18 ते 40 वर्षे |
मागास प्रवर्ग | 18 ते 45 वर्षे |
मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केलेल्या उमेदवारांबाबत
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय दि. २१ ऑक्टोबर २०२२ अन्वये मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले / भरलेले आहेत, व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन अशा उमेदवारांचे नुकसान होऊ नये, याकरिता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून फक्त या परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येत आहे. परंतू यासाठी उमेदवारांने नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहील.
त्यानुसार सन २०२३ मध्ये घेणेत येणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेकरीता ज्यांनी मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज भरलेले होते व त्यांचे वयाधिक्य झालेले आहे, अशा उमेदवारांना वयामध्ये सूट देणेत येऊन या परीक्षेकरीता पात्र समजणेत येईल.
सन २०२३ च्या जाहिरातीनुसार वयामध्ये सूट मिळविण्यासाठी उमेदवारांनी अर्ज भरताना मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केला असलेबाबत अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.
झेडपी नाशिक ऑनलाइन अर्ज फी – अर्ज फी
जिल्हा परिषद नाशिक अरज शुल्क |
|
सर्वसाधारण प्रवर्ग | रुपया. 1000 |
मागास प्रवर्ग | रुपया. ९०० |
माजी सैनिक | अर्ज शुल्क नाही |
झेडपी नाशिक ऑनलाइन अर्जासाठी इतर आवश्यक पात्रता
वरील सर्व पदांसाठी आवश्यक सामाईक अर्हता खालील प्रमाणे असेल.
सामाईक अर्हता | तपशिल |
संगणक अर्हता | कंत्राटी ग्रामसेवक व पशुधन पर्यवेक्षक पदासाठी शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस – २०१२/प्र.क्र.२७७/३९, दि. ०४/०२/२०१३ मध्ये नमूद | केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक | आहे. परंतू इतर पदांसाठी संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दि. १९/०३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. |
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन | महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ) नियम २००५ मधील तरतुदीनुसार शासकीय सेवेतील भरतीमध्ये विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापन नियुक्ती वेळेस हजर होतांना विवाहीत उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक राहील.
प्रतिज्ञापनामध्ये नमूद केल्यानुसार हयात असलेल्या अपत्यांची संख्या दोन | पेक्षा अधिक असेल तर दिनांक २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या, अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेच्या नियुक्तीसाठी अनर्ह ठरविण्यास पात्र होईल. या नियमातील व्याख्येनुसार लहान कुटूंब याचा अर्थ, दोन अपत्ये यांसह पत्नी व पती असा आहे. |
अन्य महत्वाच्या भरती [upcoming vacancy 2023]
✅पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 138 पदांची भरती!! | PGCIL Bharti 2023
✅NTPC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु! | NTPC Bharti 2023
✅BECIL अंतर्गत 155 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा!! | BECIL Recruitment 2023
✅MSEB Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती लगेच करा अर्ज | BMC BHARTI !
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://mpscworld.in ला भेट द्या.
सूचना – MPSCWORLD.In या संकेतस्थळावरील जाहिराती / माहिती ही फक्त आपल्या माहितीस्तव देण्यात येत आहे. उमेदवारांनी अधि/क माहिती करीता जाहिरातदारांच्या मूळ वेबसाईट अवश्य पाहाव्यात .
वेबसाईट अपडेट करण्याचे काम सुरू आहे लवकरच आपणास खालील लिंकस मध्ये माहिती उपलब्ध होईल.
अन्य महत्वाचे जॉब्स !!
आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.